अन्नपुर्णा योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 सिलेंडर मोफत

– लाडकी बहिणच्या महिलांना देखील लाभ

यवतमाळ :- राज्य शासनाने सन 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती स्थापना करण्यात आली आहे. सिलेंडरच्या लाभासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थीनी आपले ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. ज्यांचे केवायसी झाले नसेल त्यांनी केवायसी करून घ्यावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सुद्धा योजनेंतर्गत वार्षिक 3 सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील उज्ज्वला योजना व लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थीनी आपले संबधित गॅस एजन्सीमध्ये बँक पासबुक आणि आधारकार्ड सह जावून ई-केवाययी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पौर्णिमा दिवस' निमित्त पंचशील चौकात जनजागृती

Fri Aug 23 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत बुधवारी (ता.२१) रात्री पंचशील चौक परिसरात जनजागृती करण्यात आली. या अभियानाला पंचशील चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com