अजिंक्य कळंबे यांना नागपुर महानगर पालिका अध्यक्ष तसेच वृषभ वानखेडे ला नागपूर जिल्हा(ग्रामीण) अध्यक्ष पदी नियुक्तीची घोषणा

– नागपुरात सकारात्मक बदल ची आशा – आपने केली नवीन टीम जाहीर

नागपूर :- महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश संगठन मंत्री भूषण ढाकुळकर यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी, महाराष्ट्र द्वारे अजिंक्य कळंबे यांना नागपुर महानगर पालिका अध्यक्ष तसेच वृषभ वानखेडे यांना नागपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.

अजिंक्य कळंबे हा आम आदमी पार्टी चा सामान्य कार्यकर्ता आणि इंडिया अगेन्स करप्शन आंदोलना पासुन पार्टी मध्ये कार्यरत असून पेश्याने सिविल इंजीनियर आहेत. आम आदमी पार्टी दिल्ली मध्ये विधानसभा निवडणुकीचे २०१३ व २०१५ मध्ये काम केल्याचे अनुभव आहे. या वेळी ते अरविंद केजरीवाल यांच्या टीम मध्ये कार्यरत होते.

वृषभ वानखेडे हे स्वतंत्र विदर्भ चळवळीसाठी अनेक वर्षापासून काम करीत आहेत व वीरा फाउंडेशन या संस्थेमार्फत सामान्याचे व गोरगरिबांची सेवा करतात. आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे योगदान आहे व आम आदमी पार्टीमध्ये एक मोठा संघटन उभारण्याचं काम वृषभ वानखेडे यांनी केलं.

दोघांचेही पक्षाचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे. पार्टी युवकांना संधी देऊन पक्षात नवीन ऊर्जा भरायचे काम करीत आहे. युवकांबरोबर अनुभवी लोकांना देखील पक्ष येणाऱ्या काळात मोठ्या पदांवर घेईल व त्यांना मोठी जबाबदारी देईल असे राज्य संघटन मंत्री भूषण ढाकुलकर कर यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मान्सून में कैसे रखें अपने बालों का ख्याल: विशेषज्ञ बता रही हैं मुलायम और सुलझे बालों के लिए एलोवेरा और नारियल के फायदे

Wed Aug 2 , 2023
बारिश की रिमझिम और चारों ओर बस हरियाली ही हरियाली, मानसून का महीना वाकई बेहद खूबसूरत होता है। हालांकि, ये मौसम अपने साथ कुछ चुनौतियां भी लेकर आता है, खासकर तब जब बात बालों के देखभाल की हो। अत्यधिक उमस (ह्यूमिडिटी) हमारे बालों की प्राकृतिक नमी को नुकसान पहुंचाती है, जिससे वे रूखे, बेजान, उलझे और बेतरतीब नजर आने लगते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!