भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा

नवीन कार्यकारिणीमध्ये १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीसांचा समावेश

मुंबई :-भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष , ६ सरचिटणीस , १६ चिटणीस , ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, महाविजय अभियानाचे संयोजक आ. श्रीकांत भारतीय, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, अ‍ॅड. माधवी नाईक , संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ , प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश समन्वयक विश्वास पाठक आदी उपस्थित होते.

बावनकुळे यांनी सांगितले की, उपाध्यक्षपदी माधव भांडारी, सुरेश हाळवणकर, चैनसुख संचेती, जयप्रकाश ठाकूर, अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, एजाज देशमुख, राजेंद्र गावीत आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी आ. रणधीर सावरकर, अ‍ॅड. माधवी नाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी भरत पाटील, अ‍ॅड. वर्षा डहाळे, अरुण मुंडे, महेश जाधव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी आ. मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्यालय प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय संघटनमंत्रीपदी उपेंद्र कोठेकर (विदर्भ), मकरंद देशपांडे (पश्चिम महाराष्ट्र), संजय कौडगे (मराठवाडा), शैलेश दळवी (कोकण), हेमंत म्हात्रे (ठाणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विजया रहाटकर, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यमंत्री, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हिना गावित, राज्यातील सर्व खासदार, आमदार आदींचा समावेश आहे. याखेरीज २८८ विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक आणि ७०५ मंडलांचे प्रभारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

बावनकुळे यांनी सांगितले की राज्यातील १ कोटी नागरिकांशी संपर्क साधून त्यांना ‘सरल अ‍ॅप’ द्वारे मोदी सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांची माहिती दररोज देण्याची यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या संपर्क अभियानात सहभागी होत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित

Wed May 3 , 2023
आरोग्य केंद्रांसाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार  किशोर जोरगेवार चंद्रपूर :- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील ३१७ ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चे लोकार्पण १ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.चंद्रपूर मनपा क्षेत्रात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते आंबेकर ले आऊट ,भावसार चौक येथील हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!