अभिनेता अनुप सिंह ठाकूर, कुस्तीपटू संगीता फोगाट आणि पॅरा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट देवेंद्र झंझरीया यांची विशेष उपस्थिती
नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वाला येत्या जानेवारी महिन्यात सुरुवात होत आहे. उद्या शनिवारी 24 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा आणि क्रीडा संघटनांना फ्लॅग डिस्ट्रिब्युशन होणार आहे.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सायंकाळी 6.30 होणाऱ्या या समारंभाला अभिनेता आणि बॉडी बिल्डर अनुप सिंह ठाकूर, कुस्तीपटू संगीता फोगाट आणि पद्मभूषण, पद्मश्री पॅरा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट देवेंद्र झंझरीया यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीण दटके, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार गिरीश व्यास, अनिल सोले, सुधाकरराव देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने उपस्थित राहतील.
समारंभाला शहरातील खेळाडू, क्रीडा संघटक आणि क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी महापौर, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी केले आहे.