सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश ;दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा

– ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला दणका; तात्काळ निवडणुका घ्या …

मुंबई – सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दणका दिला आहे. राज्य सरकारनं केलेला कायदा फेटाळत 15 दिवसांत निवडणुका जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. सध्या जवळपास 14 महापालिका आणि 25 जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका 2020 च्या जुन्या प्रभागरचनेनुसार, घेण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. वारंवार निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसंच राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावरही ताशेरे ओढले आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारनं निवडणुकीबाबत केलेल्या कायद्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारनं निवडणूक आयोगाचे काही अधिकार स्वतःकडे घेण्याचा कायदा केला. या कायद्यानं प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारनं स्वतःकडे घेतले आहेत. या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीवर राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचं भवितव्य अवलंबून होतं. अशातच न्यायालयानं दोन आठवड्यांत महापालिका आणि झेडपी निवडणुका जाहीर करा, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शहरात राहणाऱ्या तीन लाख आदिवासींपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार  - रविंद्र ठाकरे

Thu May 5 , 2022
द्विवर्षपूर्ती प्रदर्शनाला भेट कल्याणकारी योजनांची सचित्र माहिती  नागपूर : नागपूर शहरात वास्तव्यास असलेल्या सुमारे तीन लाख आदिवासी बांधवांपर्यंत आदिवासी समाजाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती तसेच प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी आज दिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित सिताबर्डी येथील मेट्रो स्टेशनवरील द्विवर्षपूर्ती विकास प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!