जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीला अटक

 सावनेर :- अंतर्गत 12 कि.मी. अंतरावरील पाटणसावंगी खापा टी पॉईंट सावनेर येथे दिनांक
26/12/2021 चे 16.50 वा. ते 17.50 वा. दरम्यान सावनेर पोलीस पथक पेट्रोलिंग  करीत असतांना त्यांना गुप्त
माहिती मिळाली की, काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा
मिळालेल्या गुप्त माहिती वरुन सावनेर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन एम. एच.
-40/एन-2420 क्रमांकाच्या बोलेरो मॅक्स पिकअप गाडीला थांबवुन तपासले असता सदर वाहनात आरोपी नामे-
अजय शालीकराम बोहरे, वय 21 वर्श, रा. लौणखैरी ता. कामठी याच्या ताब्यातुन 81⁄4बैले1⁄2 कि. 68,000/-रू. चे जनावरे
निर्दयतेने वाहतुक करतांना मिळुन आले. वाहनासह एकुण किंमती 3,50,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी सरकार तर्फे पोलीस शिपाई हेमराज कोल्हे, पो.स्टे. सावनेर यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे वरील आरोपीविरुध्द कलम 11 (१) (अ)(ड) प्राणि निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक कायदा, 5(अ)(ब), 9 ,130 (१),83,177 महराष्ट्र
प्राणी रक्षण अधिनियम काद्ययान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपीला अटक करण्यात आली असूनगुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप नागरे मो.क्र. 9011596500 हे करीत आहे.
सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक श्री. राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग श्री. अषोक सरंबळकर यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस स्टेशन
सावनेरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. मारुती मुळूक यांचे नेतृत्वात सपोनि श्री. फुलेकर, पोलीस हवालदार संदीप
नागरे, पोलीस शिपाई हेमराज कोल्हे व भुपेश तभाने यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

नायलॉन मांजा जप्तीसाठी मनपाने गठीत केले झोननिहाय पथक

Tue Dec 28 , 2021
-मनापासोबत पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सहभाग   चंद्रपूर : नायलॉन मांजाला पूर्णतः हद्दपार करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पावले उचलली असून, नायलॉन मांजाच्या जप्तीसाठी झोननिहाय ३ पथक गठीत करण्यात आले आहे. यात मनापासोबत पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा सहभाग राहणार आहे. नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयातीवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com