संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची खरी गरज -आमदार चंद्रशेखर बावनकुळे
कामठी :- कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षालाच नव्हे तर समाजालाही गरज आहे.सामाजिक बांधिलकी जोपासणारा कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेशी नाळ जडवून ठेवली असल्याने जनतेची कामे करण्यास सोयीस्कर होतात.तेव्हा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याच्या मुख्य उद्देशाने कार्यकर्त्याला मोठी जवाबदारी देणे हे वरिष्ठ पदाधिकारी चे कर्तव्य आहे याचं विचारसारणीतून सर्वसामान्य नागरिकांत वावरणारा कार्यकर्ता व माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी पक्षबळकटी साठी केलेल्या अमूल्य कार्याची जाण घेऊन माजी मंत्री व आमदार तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथे झालेल्या जिल्हा कोर कमिटी सभेत माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी भाजप नागपूर जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती केली.
या नियुक्तीबद्दल नवनियुक्त जिल्हा महामंत्री अनिल निधान यांनी ज्येष्ठ नेते मंत्री ना नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर,आमदार समीर मेघे,डॉ राजीव पोतद्दार,अरविंद गजभिये,माजी आमदार सुधीर पारवे, आनंदराव राऊत रमेश मानकर, अशोक धोटे,मल्लिकार्जुन रेड्डी,संजय टेकाडे,अविनाश खडतकर,अजय बोढारे, ईश्वर यावलकर, प्रकाश टेकाडे आदीचे मनपुर्वक आभार मानत पक्ष संघटन मजबुती व बळकटीसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.