संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-अंगणवाडी सेविकेच्या सुरू असलेल्या आंदोलनाला कांग्रेसतर्फे सुरेश भोयर यांचे समर्थन
कामठी :- अंगणवाडी सेविकांना कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा,तोपर्यंत किमान वेतन 26 हजार रुपये देण्यात यावे,अंगणवाडी महिलांना माणधनाचे निम्मे पेन्शन तथा ग्रॅच्युटी देण्यात यावी या प्रमुख मागणिला घेऊन शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 4 डिसेंबर पासून कामठी तालुक्यातील अंगणवाडी सेविकानी बेमुद्दत आंदोलन पुकारले आहे .कामठी शहरातील अंगणवाडी सेविका रणाळा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग कामठी कार्यालय समोर तसेच ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका कामठी पंचायत समिती कार्यालय समोर बेमुद्दत आंदोलन करीत असून आज झालेल्या अवकाळी पावसातही आंदोलन सुरूच होते..कामठी पंचायत समिती कार्यालय परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनाला कांग्रेस पक्षाच्या वतीने समर्थन देत माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आंदोलन स्थळाला भेट देत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रेरणा देत त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
तसेच देशात लोकशाही असली तरी या लोकशाहीचे भांडवल शाहित रूपांतर झाले आहे.आणि म्हणूनच गरीब दिवसेंदिवस गरीब होतांना पहावयास मिळत आहे.तर भांडवलदार अति श्रीमंत होत आहे.गोरगरीब जनतेवरील अन्याय सतत वाढत आहे त्याचा विरोध केला तर दूर करण्याऐवजी सरकारची दडपशाही दिवसेंदिवस वाढत आहे.या दडपशाहीचा परिणाम अंगनवाडी सेविकेच्या बेमुद्दत ठिय्या आंदोलनातून दिसून येत असल्याचे मत सुरेश भोयर यांनी व्यक्त करीत या आंदोलनाला कांग्रेसतर्फे पाठींबा दर्शविला.
याप्रसंगी कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे, येरखेडा ग्रा प सरपंच सरिता रंगारी, कामठी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी आदी उपस्थित होते.