संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राज रॉयल लॉन जवळील आलम नगर रहिवासी 74 वर्षीय वृद्धाने स्वतःला असलेल्या अस्थीव्यंगाचा त्रासासह पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून शेजारच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे चार दरम्यान घडली असून मृतक वृद्धाचे नाव विठ्ठल इडपाती वय 74 वर्षे रा.आलम नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाला मागील चार पाच वर्षांपासून अस्थीव्यंगाचा झटका आल्याने व्याधीग्रस्त होता तसेच पोटाच्या विकारानेही त्रस्त होता.उपचार घेतल्यास काही दिवस बरे होत पुन्हा विकाराची स्थिती निर्माण व्हायची या सततच्या त्रासाला कंटाळून असल्याने गतरात्री पत्नी ,मुलगी व दोन नातवंडासह कौटुंबिक जेवण करून झोपी गेले असता सततच्या या व्याधी त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.