नागपूर :- कृषी विभागाच्यावतीने आंबा महोत्सवाचे आयोजन जुने प्रशासकीय भवन येथे करण्यात आले. “ विदर्भाचा राजा चांदपूरचा लंगडा” आंबा शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा आंबा अतिशय वाजवी दरामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. 15 जुन पर्यंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फळबाग शेतीचे महत्व ओळखून तुमसर तालुक्यातील चांदपूर येथील शेतकरी दिलीप लांजे यांनी फळबाग शेती करण्याचे ठरविले. उच्चविद्याविभूषीत असलेले दिलीप लांजे हे मागील 33 वर्षापासून आपल्या 5 एकर शेतामध्ये आंबा लागवड करून 10 लाखाचे वार्षिक उत्पादन घेत आहे. दिलीप लांजे हे Msc Botany या विषयामध्ये पदवीधर आहे.परंतु नोकरीच्या मागे न लागता त्यांनी उत्तम शेती करण्याचे ठरविले, त्यांच्याकडे 17 एकर शेती आहे. ते 5 एकर शेतामध्ये आंब्याचे फळपीक घेतात.या पाच एकरमध्ये ते लंगडा व दशेरी या जातीचे आंबे पिकविता. याशिवाय त्यांच्या शेतामध्ये चवसा, केशर, फजली, तोतापली, अशी वेगवेगवेगळ्या जातीची जवळपास सव्वादोनशे झाडे त्यांनी लावली आहे.
नैसर्गिक पध्दतीने पिकविलेले आंबे त्यांच्या शेतामध्ये आहे. आंब्याला डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मोहोर येतो. आंब्याला दोन प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. परंतु योग्य पध्दतीने त्यांचे व्यवस्थापन व नियोजन केले तर यावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य असल्याचे श्री लांजे यांनी सांगितले, यामध्ये प्रामुख्याने तुडतुडा (मॅगो हापर) आणि फळमाशी (फुट फ्ल्याय) या किडीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी (Entopathogenic) (Verticillum) या किटकनाशकांचा वापर करून त्यांचा नायनाट करण्यात येतो.
फळमाशी ही आंबे उत्पादनासाठी खूप घातक आहे. यासाठी फोरोमॉळ टॅपरसा आणि गंध सापळे यांचे हेक्टरी 30 युनीट याप्रमाणे वापर केला जातो. बुरशीचा नायनाट करण्यासाठी ताक व तांबे यांचे सम प्रमाणात मिश्रण घेवून त्यावर डेअर स्प्रे केल्या जातो. यासोबतच Trichoderma Viridae या बुरशी नाशकाचाही वापर केल्या जातो. अधूनमधन Wasre Decomposer आणि ग्रो गुपा अमृतम या मिश्रणाचा स्प्रे करून बुरशीला नियंत्रित केले जाते.
उपन्न वाढविण्यासाठी पारंपारिक शेती पद्ध्तीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी प्रयोगशील असणे गरजेचे असल्याचे दिलीप लांजे यांनी यावेळी सांगितले. अशा पध्दतीने शेतकऱ्यांनी फळबाग शेती करून उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत मजबूत करावे असे ते यावेळी म्हणाले.