स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराने थाटात साजरा..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवा निमित्य विदर्भ भुमिपुत्र संघटन व्दारे तारसा रोड चौक महाकाली कॉम्पलेक्स कन्हान येथे भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीरात ५९ रक्त दात्यानी रक्तदान व ७३ नागरिकांनी बुस्टर डोज घेत लाभ घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

सोमवार (दि.१५) ऑगस्ट २०२२ ला सकाळी १०.३० वाजता तारसा रोड चौक महाकाली कॉम्पले क्स कन्हान येथे आयोजित भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराचे विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे आयोजन करून नगराध्यक्षा करूणाताई आष्टण कर यांचे हस्ते उद्घाटन करून सुरूवात करण्यात आली. शिबीरास इंदिरा गांधी शासकिय वैद्यकीय महा विद्यालय व रूग्णालय रक्तपेढी नागपुर व प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या डॉक्टर सह चंमुच्या सहका र्याने कन्हान परिसरातील ५९ रक्तदात्यानी रक्तदान केले तर १८ वर्षावरील ७३ नागरिकांनी बुस्टर डोज घेत लाभ घेऊन ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. तसेच तपस्या फाऊं डेशन रामटेक, एम सी एम संविधानिक हक्क संघटन कन्हान, शिवराय ग्रुप खंडाळा यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबीरास मा. प्रशांत सांगोडे तहसिलदार पार शिवनी सह रामटेक विधान सभा क्षेत्रातील मान्यवरांनी सद्ईच्छा भेट दिली. भव्य रक्दान व बुस्टर डोज शिबी राचे आयोजक विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान अध्यक्ष श्री शिवशंकर (चिंटु) वाकुडकर हयानी तर संयोजक रजनीश मेश्राम, समशेर पुरवले, सुनिल लक्षणे, हरीश तिडके, भरत चकोले, राम भैया थदानी, दीपक कुंभल कर, प्रदीप गायकवाड, आशिष वानखेडे, मयुर माटे, कैलास भाऊ बिरो, सुकलाल यादव, सरिताताई बिरो, आशिष देशमुख, प्रमोद मोहतकर, राधेश्याम राऊत, श्रीकृष्ण माकडे, गुड्डा सूर्यवंशी, पवन ठाकुर, मंगेश धोटे आदी सह युवक, शहरवासीयांनी शिबीराच्या यशस्विते करिता परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लोधी समाज सावनेर द्वारा अमर वीरांगना रानी अवंतीबाई लोधी की 191 वीं जयंती बड़े हर्षोल्हास से मनाया गया । |

Tue Aug 16 , 2022
सावनेर – 1857 के प्रथम स्वतंत्रता संग्राम सेनानी अमर वीरांगना रानी अवंतीबाई लोधी की 191 वीं जयंती के अवसर पर लोधी समाज,सावनेर शहर के गांधी पुतला स्थीत पुरातन श्री हनुमान मंदिर के प्रांगण मे शहर के समस्त लोधी समाज बांधवोने एकत्रीत होकर विरांगना राणी अवंतीबाई जयंती हर्षोल्हास से मनाया गया । वीरांगना महारानी अवंतीबाई लोधी का जन्म लोधी राजपूत समुदाय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com