– दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाकरीता आठ अमृत कलश रवाना
भंडारा :- आझादी का अमृत महोत्सवानिमित्त मेरा माटी, मेरा देश या कार्यक्रमांतर्गत आज बुधवारी (25 ऑक्टोबर) जिल्हा प्रशासनाचे वतीने भंडारा शहरातून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. हुतात्मा स्मारक येथून प्रांरभ होऊन बाईक रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ढोलताशाच्या गजरात पोहचली. खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर एम. कुर्तकोटी यांचे प्रमुख उपस्थितीत नेहरू युवाकेंद्राचे समन्वयकांना अमृकलश स्वाधीन करुन 31 ऑक्टोबरला होणाऱ्या भव्य कार्यक्रमाकरीता अमृत कलश दिल्ली साठी रवाना करण्यात आले. जिल्हा प्रशासनाचे वतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त भंडारा जिल्ह्यात “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्राम पंचायत, गावस्तरावर या उपक्रमाचे माध्यमातून अमृत कलश यात्रा काढून देशसेवेकरीता बलिदान देणाऱ्या शहीद व सैनिकांचे स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली. आज बुधवारी जिल्हा प्रशासनाचे वतीने दिल्ली येथे 31 ऑक्टोबर ला आयोजित अमृतकलश यात्रेकरीता सहभागी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील आठ कलश नेहरू युवा केंद्राच्या समन्वयकांच्या स्वाधीन करण्याकरीता हुतात्मा स्मारक (लालबाहदुर शास्त्री चौक) ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणापर्यंत अमृतकलश यात्रा काढण्यात आली. भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर एम. कुर्तकोटी यांचे मार्गदर्शन व नियोजनात भंडारा शहरातून सकाळी 9 वाजता भव्य बाईक रॅली आयोजीत करण्यात आली. हुतात्मा स्मारक येथे भगतसिंग, राजगुरू यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून रॅलीला सुरूवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर एम. कुर्तकोटी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवळी, जिल्हा सहआयुक्त सिध्दार्थ मेश्राम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) एम.एस. चव्हाण, जिल्हाआरोग्य अधिकारी मिलींद सोमकुंवर, गट विकास अधिकारी, सातही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रा. भोजराज श्रीरामे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आदींची उपस्थिती होती.हुतात्मा स्मारक येथून निघालेली अमृत कलश यात्रेची बाईक रॅली भंडारा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमणकरीत जे.एम.पटेल महाविद्यालयाच्या NCC व स्काउट गाईड संचाच्या ढोल ताशात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पोहचली. अमृतकलश यात्रेनिमित्त आयोजित बाईक रॅलीमध्ये मा. जि.प.सदस्य, पं.स.सभापती, गट विकास अधिकारी, जि.प.विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, बचतगट महिला सहभागी झाले. यावेळी पंचायत समिती भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर व पवनी अंतर्गत 7 व नगर परिषद भंडारा अंतर्गत 1 असे आठ अमृतकलश व जे एम पटेल कॅालेजच्या विद्यार्थांनी जिल्हाभरातुन संकलित केलेली मातीसह सर्व बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते . जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अमृतकलश दिल्ली येथे पाठविण्यासाठी अमृतकलश हस्तांतरणाचा कार्यक्रम खासदार मा. श्री. सुनीलजी मेंढे, जिल्हाधिकारी मा.श्री. योगेश कुंभेजकर, मुख्यकार्यकारी अधिकारी समीर एम. कुर्तकोटी, यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. 31 ऑक्टोबर ला दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाकरीता खासदार सुनील मेंढे यांचे हस्ते आठ अमृतकलश नेहरू युवा केंद्राचे समन्वयक यांना सोपविण्यात आले. या प्रसंगी खासदार, जिल्हाधिकारी यांनी देशसेवेकरीता प्राणाची बाजी लावणाऱ्या वीर सैनिकांचे स्मरण करून आदरांजली वाहिली. खासदार महोदय यांनी मेरी माटी मेरा देश बाबतची पार्श्वभूमी व या कार्यक्रमाची महती विशद केली .आजच भंडारा येथून आठही अमृतकलश दिल्ली येथे नेहरू युवा केंद्राचे समन्वयकांचे हस्ते प्रस्थान करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालक मुकूंद ठवकर यांनी तर आभार उमेश नंदागवळी ,उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मानले. अमृतकलश यात्रेमध्ये मा. जि.प.सदस्य, पं. स. सभापती, गट विकास अधिकारी, जि. प., पं.स. विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, बचतगट महिलांची उपस्थिती होती.