– झोनस्तरावर आमदार, लोकप्रतिनिधी व मनपा मुख्यालयात आयुक्तांनी दाखविली हिरवी झेंडी
नागपूर :- केंद्र आणि राज्य शासनाचा निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत नागपूर शहरातील अमृत कलश यात्रेला सोमवार (ता.१८)पासून सुरूवात झाली. नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनस्तरावरुन ही यात्रा काढण्यात आली असून विविध झोनमध्ये स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी व मनपा मुख्यालयातून आयुक्तांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली.
गांधीबाग झोनमध्ये आमदार प्रवीण दटके व राजे मुधोजी भोसले, हनुमान नगर झोनमध्ये आमदार मोहन मते, धंतोली झोनमध्ये आमदार प्रवीण दटके, लकडगंज आणि नेहरू नगर झोनमध्ये आमदार कृष्णा खोपडे, सतरंजीपुरा झोनमध्ये आमदार विकास कुंभारे, लक्ष्मीनगर झोनमध्ये माजी महापौर संदीप जोशी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. धरमपेठ झोनच्या रॅलीला मनपा मुख्यालयामधून सुरूवात झाली. या रॅलीला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त सुनील लहाने, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ.पीयूष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, झोनल अधिकारी दीनदयाल टेंभेकर, स्वयंसेवी संस्था तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंधडा, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे आदी उपस्थित होते.
आशीनगर झोनमधील रॅलीमध्ये सहायक आयुक्त हरीश राउत, माजी नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेविका मंगला लांजेवार यांनी तर धंतोली झोनमधील रॅलीमध्ये माजी नगरसेवक प्रमोद चिखले, माजी नगरसेविका वंदना भगत, विशाखा बांते उपस्थित होते. विविध झोनमधील रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी सहायक आयुक्त सर्वश्री मिलींद मेश्राम, गणेश राठोड, घनश्याम पंधरे, पुष्पगंधा भगत, अजय कुरवाडे, यांच्यासह सर्व झोनल अधिकारी उपस्थित होते. सर्व झोनस्तरावर प्रारंभी माती हातामध्ये घेउन पंचप्रण प्रतिज्ञा देखील घेण्यात आली.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाद्वारे नागपूर शहरातून अमृत कलश यात्रा काढली जात आहे. या यात्रेदरम्यान मनपाच्या दहाही झोन स्तरावर प्रत्येक प्रभागामध्ये घराघरांतून माती किंवा तांदूळ संकलीत केले जात आहे. या अभियानामध्ये शहरातील स्वयंसेवी संस्थांचे उत्तम सहकार्य मिळत असून संबधित झोन अंतर्गत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अमृत कलश यात्रेसोबत जाउन नागरिकांना अभियानाची माहिती देत आहेत व त्यांना अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी उस्फुर्तपणे मुठभर माती व तांदुळ अमृत कलशामध्ये अर्पित केले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना अभियानाची माहिती देताना सांगितले की, मेरी माटी मेरा देश अभियानाच्या माध्यमातून देशाची राजधानी दिल्ली येथे कर्तव्य पथवर अमृत वाटिका साकारण्यात येत आहे. या ऐतिहासिक अभियानात आपल्या नागपूर शहराचा देखील सहभाग आणि वाटा असावा या हेतूने शहरातून घराघरातून माती जमा केली जात आहे. सर्व झोनमधून माती संकलीत झाल्यानंतर नागपूर शहरातील मातीचे प्रतिकात्मक एक कलश राजधानी दिल्ली येथील कर्तव्य पथवर अमृत वाटिकेसाठी पाठविले जाणार आहे. या ऐतिहासिक अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवून नागरिकांनी आपल्या परिसरात येणा-या कलश यात्रेमध्ये सहभागी होत माती जमा करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
रॅलीमध्ये भजनासह प्रबोधन
नागपूर शहरातून काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेमध्ये गोपालपुरी धापेवाडा भजन मंडळ, दहेगाव रंगारी, कोराडी आणि महादुला येथील गुरूदेव भजन मंडळाचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले आहेत. हे सर्व भजन मंडळी अमृत कलश यात्रेमध्ये भजन गात प्रबोधन देखील करीत आहेत. मनपा मुख्यालयामध्ये अमृत कलश यात्रेची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘या भारतात बंधुभाव नित्य असू दे…’ या भजनासह झाली. गुरूदेव भजन मंडळाचे पुंडलीक चौधरी, सुनील बर्गी, गंगाराम गौरकर, हरीभाउ निकम, संभाजी सोनवणे, बबनराव डोंगरे यांनी राष्ट्रसंतांचे भजन गात रॅलीचे प्रबोधन केले. मनपा मुख्यालयातील कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व शेवटी त्यांनी आभार देखील मानले.