संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
काटोलबस डेपोत घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व देवतांच्या मोठे फोटो लावुन केले भव्य दिव्य अनावरण
काटोल – वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे व सामाजिक कार्यकर्ते हर्षद बनसोड यांच्या आक्रमक आन्दोलनापुढे डेपो प्रशासन झुकले एस टी डेपोत दिगांबर डोंगरे व हर्षद बनसोड जिवन गायकवाड आंबेडकरी जनतेचे तिव्र आंदोलन काटोल बस डोपोचे गेल्या चार वर्षापासून दुरुस्तीचे काम चालु होते. त्यामुळे जुने चौकशी कक्षाला भंगार रूम बनवून वेस्टेज मटेरियल या रूममध्ये टाकल्या जात होते त्याच घटनेचे शिल्पकार परम पुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे व देवतांच्या च्या फोटवा कचऱ्याच्या अवस्थेत धुळीखात जाळक्या लागलेल्या अवस्थेत होत्या.
त्या अवस्थेत असलेल्या फोटवा,प्रणय गायकवाड प्रफुल्ल गायकवाड अमन गायकवाड हर्षल सहारे प्रज्वल रंगारी रोहित बनसोडे तुषार मरापे राम नागपूरकर अभिषेक रामपूरकर मयूर सुकाम या तरूण विद्यार्थ्याना दिसल्या महामाणवाचा व अन्य देवतांचा. डेपोतल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे होत असलेला अपमान त्या आंबेडकरी विद्यार्थ्याना सहन झाला नसल्यामुळे त्यानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा काटोल न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे व सामाजिक कार्यकर्ते हर्षद बनसोड यांना डेपोत बोलावून असलेला प्रकार दाखवला.
यानंतर हा अपमानजनक प्रकार पाहून दिगांबर डोंगरे व हर्षद बनसोड यांनी डेपोचे व्यवस्थापक पद्मगीरवार व रामटेके निरीक्षण अधिकारी होले म्याडम व अन्यलोकांना बोलावून संबंधीत प्रकाराबाबत विचारणा करतेवेळी घाबरलेल्या अवस्थेत उडवाउडविचि उत्तरे देवू लागले पण संबंधीत घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारायला कोनोही तयार नव्हते. त्यामुळे आंदोलन अधिक तिव्र करत अधिकाऱ्याच्या विरोधात नारेबाजी करत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले महापुरुषांच्या व देवतांच्या झालेल्या अपमानाची व याबाबात होत असलेल्या आंदोलनाची माहिती शहरात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरली व हजारोंच्या संख्येने आंबेडकरी बांधव एकत्र आले व आंदोलनाने तिव्र रूप घेतले असता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून डेपो प्रशासनानी काटोल पोलिसांना बोलावून घेतले त्यांनीही आंदोलन करत्याणा समजावण्याचा खुप प्रयत्न केला.
पण घटनेची जबाबदारी जोपर्यंत कोणी घेत नाही घडलेल्या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई होत नाही व जोपर्यंत माहामानवांच्या व अन्य देवतांच्या सन्मान जनक फोटो लावणार नाही.व झालेल्या चुकीची लेखी माफी मागत नाही तो पर्यंत आंदोलन चालूच राहील व एकही बस डेपोच्या बाहेर जावू देणार नाही आम्ही मेन रोडवर झोपून जावू अशी दिगांबर डोंगरे हर्षद बनसोड व आंदोलन कर्त्यानी भुमिका घेतल्यामुळे प्रशासन व आंदोलन कर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
आंदोलन अधिक आक्रमक होवु नये म्हणून डेपोच्या अधिकाऱ्यांनी व पोलीसानी नागपूरच्या विभागीय व्यवस्थापकाशी दिगांबर डोंगरे यांच्याशी बोलणी करून दिली त्यांनी वरील मागण्या त्वरित मंजुर करून घडलेल्या घटनेला डेपो म्यानेजर व निरीक्षण अधिकारी हेच खरे जबाबदार आहेत तेच लेखी माफी मागतील व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे व अन्य देवतांचे सन्मानजनक विधीवत फोटो तात्काळ उद्याच्या उद्याच लावण्यात येईल व आंदोलन करत्यांच्याच हस्ते त्यांचे अनावरण करण्यात येईल या नंतर अशा प्रकारे घटना होणार नाही असे विभागीय व्यवस्थापकानी सांगितल्यानंतर काटोल डेपोचे व्यवस्थापक पद्मगीरवार व निरीक्षण अधिकारी होले म्याडम यांनी संपुर्ण जबाबदारी स्वीकारली व लेखी माफी मागून मोठ्या स्वरूपात सन्मान जनक फोटो लावण्याचे लेखी लिहून दिले.
शेवटी आंदोलन कर्त्यांचे समाधान झाल्यानंतर आज दुपारी डेपोत अग्रणी भागात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पाच फुटाचा.व अन्य देवतांच्या फोटो लावुन दिगांबर डोंगरे हर्षद बनसोड व हजारो आंदोलन कर्त्यांच्या उपस्थितीत विधीवत अनावरण करण्यात आले याप्रसंगी दिगांबर डोंगरे व हर्षद बनसोड यांनी हा विजय आंबेडकरी चळवळीचा असुन जनतेच्या एकजुटिचा आहे असे सांगुन प्रशासनाचे आभारही मानले.
आंदोलन व अनावरण प्रसंगी दिगांबर डोंगरे हर्षद बनसोड जिवन गायकवाड प्रणय गायकवाड प्रफुल्ल गायकवाड अमन गायकवाड हर्षल सहारे प्रज्वल रंगारी रोहित बनसोडे तुषार मरापे राम नागपूरकर अभिषेक रामपूरकर मयूर सुकाम मिना पाटील सुषमा सहारे वर्षा सोमकुवर सरीता रंगारी प्रधण्या डोंगरे शालिनी बनसोड प्रतिमा देशभ्रतार.अम्रपाली सहारे रीना बनसोड लता रंगारी सुजाता गायकवाड देविदास घायवट सुधाकर कावळे.सतीश पाटील अनंतराव सोमकुवर कृष्णाजी गवईकर सुरेश देशभ्रतार सुरेशराव निसवादे गोलु चव्हाण बाबाराव गोंडाने दिगांबरराव भगत बाबाराव तागडे गुलाबराव तागडे सुरज डफर यांच्यासह हजारो आंदोलक सहभागी होते.