संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील कढोली गाव हे एक आदर्श गाव असून या गावाचा सरपंच म्हणून मला गावाचा विकास करण्याची संधी मिळाली असून या संधीचे सोने करीत गावाचा विकास हाच एक ध्यास आहे तसेच कढोली गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे मौलिक मत कढोली ग्रा प चे सरपंच लक्ष्मण करारे यांनी गावातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.
कामठी मौदा विधानसभे अंतर्गत दिनांक 27/12/2023 ला कामठी तालुका मध्ये कढोली या गावांमध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले त्याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर,माजी जी प सदस्य अनिल निधान व तालुक़ाअध्यक्ष उमेश रडके, तालुका महिला आघाडी अध्यक्ष प्रांजल राजेश वाघ, संजय गांधी योजना अध्यक्ष रमेश चिकटे आणि ग्रा.प उपसरपंच महेश कुपाले , ग्रामसेवक श्याम कूचेकर व ग्रा.प सदस्य गण, किशोर बेले, सचिन डाँगे, सचिन घोडमारे,कैलास महल्ले दत्तू शाहने,मोरेश्वर ठाकरे, देवेंद्र गवांडे ,लक्ष्मण ठाकरे, अशोक घुले, स्वप्नील कडू, चंदू गाडबैल, नानूताई ठाकरे, रेखा गावंडे कामठी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.