संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 17 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले त्याअंतर्गत आज बुधवार 17 ऑगस्ट ला सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात नगरपालिका कामठी क्षेत्रातील सर्व नागरिक, खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था,शहरातील समस्त नागरिकांसह सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यासह ,सहकारी संस्था, सर्व यंत्रणांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा असे आवाहन कामठी नगर परिषदचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.
सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी 11 ते 11 वाजून एक मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे.