संपूर्ण जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

भंडारा : कोरोनाचा प्रादुर्भाव, एस. टी. महामंडळाचे राज्यव्यापी संप व आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यात 14 ते 28 डिसेंबर 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) लागू करण्यात आले आहे.

याअंतर्गत पुढीलप्रमाणे निर्बंध लावण्यात आले असून यात शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी कोणतीही वस्तु सोबत ठेवणे. कोणताही दाहक पदार्थ व स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे, तयार करणे, व्यक्तिंचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा प्रतिमा त्यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे, सोंग करणे किंवा अशी चित्रे, चिन्हे, फलके किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा जनतेत त्यांचा प्रसार करणे, अशा विविध बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच या अंतर्गत संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पाच किंवा अधिक व्यक्ती रस्त्यावर एकत्र जमण्यास सदर आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य काळात सदर आदेश लागू होणार नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व्यस्त असल्यामुळे दरम्यानचे कालवधीत आचारसंहिता संपेपर्यंत मिरवणुकीबाबत व कार्यक्रमाबाबत परवानगी देण्याचे अधिकार त्यांचे क्षेत्रात, संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांना राहील, असे  अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी महेश पाटील यांच्या आदेशात नमुद आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

क्रीडा मैदान विकास हेतू 65 लाख निधी के नियोजन प्रारूप पर कार्यवाही की घोषणा!

Mon Dec 13 , 2021
वाडी(सं) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष के संस्थापक व प्रमुख,पूर्व रक्षा व कृषी मंत्री शरदचंद्र पवार के 81 वे जन्मदिवस अवसर पर रविवार को वाडी क्षेत्र मे वाडी राष्ट्रवादी पक्ष की ओर से विविध सामाजिक उपक्रम का आयोजन किया गया था.दत्तवाडी स्थित क्रीडा मैदान मे जन्मदिवस उपलक्षमे आयोजित व्हॉलीबॉल खेल स्पर्धा का उदघाटन दोपहर को राष्ट्रवादी के प्रमुख पदाधिकारी पूर्व जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com