आकाशवाणी रिले केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन उद्घाटन

गडचिरोली :- देशात एकाच वेळी 91 एफ एम केंद्र व रिले केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यात आपल्या गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा व अहेरी या दोन ठिकाणावरील रिले केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमामुळे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात चा 100 वा भाग रेडीओच्या माध्यमातून ऐकावयास मिळणार आहे. या रिले केंद्राचा फायदा जिल्ह्यातील आकाशवाणी केंद्राच्या बातम्यांच्या व कार्यक्रमांच्या चाहत्यांना होणार असुन कोणत्याही एंटीना शिवाय रेडीओ सेटवर तसेच मोबाईलवर आकाशवाणी मुंबई केंद्रावरुन प्रसारीत होणारे विविध भारतीचे कार्यक्रम सुरळीत एकावयास मिळणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील खासदार, आमदार व अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात 'हिरकणी कक्षाचे अस्तित्व नगण्यच'

Wed Apr 26 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यात तहसील कार्यालय ,नगर परिषद ,पंचायत समिती,पोलीस स्टेशन यासारखे विविध शासकीय कार्यालय असून या कार्यालयात महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .मात्र या सर्व शासकीय संस्थांमध्ये हिरकणी कक्ष दिसुन येत नसल्याने कामठी तालुक्यात हिरकणी कक्षाचे अस्तित्व नगण्यच असल्याचे दिसून येते. कामठी तालुक्यातील या सर्व शासकीय संस्थेत हिरकणी कक्ष नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com