पुणे शहरात सुरळीत वाहतुकीसाठी ‘एआय’ वर आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई :- पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पुणे शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी दिली.

सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातीला कायदा अधिक कडक केला जाणार असल्याचे सांगून राज्यमंत्री कदम म्हणाले, या गुन्ह्यातील अपराधीवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींची लवकर सुटका होऊ नये यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिस यंत्रणेचा समन्वय वाढविला जाईल. शहरातील वाहतूक नियमन, स्पीड ब्रेकर, अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर उपाययोजना व अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल सिस्टिम आणि अन्य सुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येईल. पुणे शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली.

राज्यमंत्री कदम म्हणाले, लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून. अशा घटना घडू नयेत म्हणून महापालिका व पोलिस यंत्रणेने आवश्यक उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मौदा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित

Wed Mar 12 , 2025
अरोली :- महाराष्ट्र ग्रामीण संघ तालुका मौद्याची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. नागपूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रघुनाथ शहारे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनात ही कार्यकारणी गठीत करण्यात आली असून यात अध्यक्षपदी शैलेश रोशनखेडे यांची तर सचिव अजय मते यांची निवड करण्यात आली. नव्याने या निवडीत फेरबदल करण्यात आला असून या निवडीत तालुका कार्याध्यक्ष पदी तुषार कुंजेकर. उपाध्यक्षपदी महेंद्र चकोले, प्रेस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!