रामटेक :-ग्रामपंचायत शितलवाडी (परसोडा) येथे नुकतेच दिनांक ३१ मे रोज बुधवारला “पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर ” यांची जयंती तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना साजरी करण्यात आली.
दरम्यान ३१ मे ला ठीक ११:०० वाजता ग्राम सवांद भवन येथे सदर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नायब तहसीलदार बडवाईक, एम.एस.ई.बी. मनसर चे जे. ई.देशमुख, मंडळ अधिकारी जांभूळे, शीतलवाडी सर्कल चे तलाठी प्रतीक कास्टे, सरपंच मदन सावरकर, विनोद सावरकर उपसरपंच आदी. उपस्थित होते. मान्यवरांनी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजमाता जिजाऊ ” यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी टि. ए. गिरमकर, ग्राम पंचायात सदस्य, सदस्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी धनराज पालीवार, अविनाश चन्ने, जितेंद्र बेलें, पुरुषोत्तम मोहनकर, प्रफुल डोंगरे यांनी अथक परिश्रम घेतले.