कामठी तालुक्यात कृषी दिन साजरा..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 2 :- बदलत्या वातावरणाचा प्रतिकुल परिणाम शेतीवर होत आहे.त्याच त्या पिकाची लागवड केल्यामुळे उत्पादनातसुद्धा घट होत आहे.तसेच जमिनीची सुपीकता सुद्धा खालावत चालली आहे यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केल्यास त्याचा निश्चित फायदा होईल.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून त्यांची कामगिरी लक्षात घेत दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै हा दिवस कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यानुसार कामठी तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप हा 1 जुलै कृषी दिन म्हणूंन लोंणखैरी येथे साजरा करण्यात आला.

कामठी तालुका कृषी विभाग तसेच कामठी पंचायत समिती च्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कामठी तालुक्यातील लोणखैरी येथे 1 जुलै कृषी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री कै वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सभापती दिशाताई चनकापुरे ,प्रमुख पाहुणे प्रा अवंतिका लेकुरवाडे ,गटविकास अधिकारी अंशुजा ताई गराटे,उपसभापती दिलीप वंजारी,तालुका कृषी अधिकारी विजय नंदनवार ,लोंणखैरी ग्रा प सरपंच भोयर,उपसरपंच झोडापे, गौरकर, डडमल, नामदेवराव लांजेवार,गौतम कांबळे,पंकज लोखंडे, गौरखेडे, लाडे, साखरे,विराग देशमुख, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद नागपूर च्या महिला व बाल कल्याण सभापती प्रा अवंतिका ताई लेकुरवाडे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांचे कृषी क्रांतीतील योगदान तसेच कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषी दिन साजरा करण्यात येतो याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनांचे वसंतराव नाईक हे कैवारी मानले जातात तसेच भूमिहीनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप करून शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फलविण्याचे व कृषी संस्कृतिला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य यांनी केले या मार्गदर्शनातून उजाळा दिला.याप्रसंगी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी शेतकरी हा कारखानदार झालाच पाहीजे आणि शेतकऱ्यांचे लेकरं सुद्धा कलेक्टर झाली पाहिजे हे महानायक वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते.थेट बांधावर आधुनिक कृषितंत्रे व दूरगामी उपाययोजनांची अंमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती ,शेतकऱ्याप्रति जिव्हाळा निर्माण केल्यास नाईक कै.वसंतराव नाईक यांचे स्वप्ने पूर्णत्वास येऊ शकते असे मनोगत व्यक्त केले .दरम्यान सभापती दिशा चनकापुरे यांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले तसेच तरुण शेतकऱ्यांनी शेती सोबत पूरक व्यवसाय सुरू करून इतर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले व ,तालुका कृषी अधिकारी विजय नंदनवार, लांजेवार, कांबळे आदींनी समयोचित असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाडे तर आभार प्रदर्शन लांजेवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून कार्यक्रमात मोठ्या संख्येत शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Eknath Shinde - Devendra Fadnavis ministry expanded.

Sun Jul 2 , 2023
Ajit Pawar sworn in as Deputy Chief Minister 8 more ministers inducted Mumbai – The year- long Eknath Shinde – Devendra Fadnavis cabinet in Maharashtra was expanded with the induction of 9 ministers. State Governor Ramesh Bais administered the oath to NCP Leader Ajit Pawar as the second Deputy Chief Minister of Maharashtra.The Governor also gave oath to Chhagan Bhujbal, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com