“अग्निवीर हे केवळ सैनिक नाहीत तर नेते, नवोन्मेषक आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षणकर्ते देखील आहेत ”- सीडीएस जनरल अनिल चौहान

नवी दिल्ली :- अग्निवीर हे केवळ सैनिक नाहीत तर नेते, नवोन्मेषक आणि देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षणकर्ते देखील आहेत असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस ) जनरल अनिल चौहान यांनी म्हटले आहे . त्यांनी 20 मे 2024 रोजी बेळगावी येथील मराठा रेजिमेंटल सेंटर आणि एअरमेन ट्रेनिंग स्कूल (एटीएस) येथे प्रशिक्षण घेत असलेल्या अग्निवीरांशी संवाद साधला.

लष्करी सेवेचा उदात्त हेतू आणि लष्करी व्यवस्थेतील तिची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत मराठा रेजिमेंटल सेंटर येथे सीडीएस चौहान यांनी सशस्त्र दलांची निवड केल्याबद्दल अग्निवीरांचे कौतुक केले. राष्ट्राप्रती त्यांच्या असाधारण कर्तव्याचा हा दाखला असल्याचे त्यांनी नमूद केले.

सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या वैयक्तिक समस्या आणि आव्हानात्मक वातावरणात काम करताना त्यांना सहन कराव्या लागलेल्या अडचणी यांची दखल घेत जनरल अनिल चौहान यांनी आश्वस्त केले की, अनेक आव्हाने असूनही अग्निवीरांना त्यांचा हा प्रवास हितकारक वाटेल आणि देशसेवा करताना प्रत्येक टप्प्यावर त्यांचे व्यक्तिमत्व आणि अभिमानाची भावना उंचावेल.

युद्धाचे बदलते स्वरूप अधिक उलगडून सांगताना सीडीएस चौहान यांनी सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विषम धोके यांसह भविष्यातील संघर्षांची जटिलता आणि अनिश्चितता अधोरेखित केली जी आता युद्धभूमीचा अविभाज्य भाग आहेत. त्यांनी तंत्रज्ञान एकत्रीकरण आणि सातत्यपूर्ण अध्ययन आवश्यक असल्याचे सांगत नमूद केले की अत्याधुनिक प्रगतींशी सुसंगत राहण्याबरोबरच,युद्धाप्रति अभिनव दृष्टीकोन प्रदर्शित करण्याची गरज आहे.

त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना अधोरेखित केले की शिकणे ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, विशेषत: सतत बदलत्या आणि गतिमान युद्धाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा अवलंब आणि कौशल्यात सातत्याने वाढ करण्याची जबाबदारीची भावना आवश्यक आहे. त्यांनी प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक उत्कर्ष साधताना सचोटी, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि एकजुटीची मूल्ये जोपासण्याचा सल्ला दिला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

350 कंत्राटी कामगारांचा महाप्रवेश सोहळा संपन्न 

Wed May 22 , 2024
– तांत्रिक अप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशन मध्ये प्रवेश नागपूर :- महाराष्ट्रामध्ये तिन्ही विज कंपनी स्तरावरील कंत्राटी कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या तांत्रिक कामगार युनियन 5059 प्रणित तांत्रिक अप्रेंन्टीस्, कंत्राटी कामगार असोसिएशन मध्ये अहमदनगर जिल्हयातील 350 कंत्राटी कामगारांचा 19 मे 2024 रोजी प्रवेश सोहळा संपन्न झाला असल्याची माहीती तांत्रिक अप्रेंन्टीस, कंत्राटी कामगार असोसिएशन चे राज्यकार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com