कोदामेंढी :- मागील पंचवीस वर्षा पूर्वीपासून मौदा व मौदा तालुक्यात पत्रकारिता करीत असलेले ,दहा वर्षांपूर्वी साप्ताहिक राष्ट्रनीती व एक वर्षांपूर्वी सायं. दैनिक राष्ट्रनीती काढणारे माथणी रहिवासी मुख्य संपादक तथा पत्रकार, मौदा तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ सहारे यांनी आज विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कामठी येथे नामांकन अर्ज दाखल केला आहे. तशी पोस्ट त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील त्यांच्या स्टेटस वर टाकलेली आहे. लोकसभेतही कामठी येथील वंश न्यूज ऑनलाइन डिजिटल वेब पोर्टल चे मुख्य संपादक पत्रकार सुनील साळवे यांनीही लोकसभेच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते हे विशेष. सहारे यांच्या मौदा तालुक्यातील दांडगा जनसंपर्क पाहता त्यांच्या मतांची टक्केवारी कामठी विधानसभेतील जय पराजय होणाऱ्या उमेदवारांच्या टक्केवारीवर निश्चितच छाप पाडणार असे तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बोलून दाखवत आहे.
कामठी विधानसभेत मुख्य लढत मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे टेकचंद सावरकर यांच्याकडून पराभूत झालेले काँग्रेसचे सुरेश भोयर विरुद्ध निवडणूक कधीही न हरलेले , सतत दोनदा कामठी विधानसभेतून निवडून आलेले व त्यानंतर विधान परिषदेतूनही निवडून आलेले ,आमदारकीची हॅट्रिक केलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष संपूर्ण कामठी क्षेत्रातील गावागावांमध्ये विकासाची गंगा आणणारे प्रभावशाली नेतृत्व असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सरळ लढत होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे मौदा तालुक्यातील नागपूरचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांना मातोश्री वरून निवडणूक न लढण्याचे फर्मान आल्याने त्यांनी निवडणूक लढण्यासाठी अर्ज सादर न केल्याचे सोशल मीडियावरील त्यांच्या स्टेटसवर त्यांनी टाकलेल्या पोस्टवरून माहिती मिळाली.