बुरशी चढलेले तांदूळ होतोय गोदामात डंप..
गोंदिया – जिल्ह्यातसह संपूर्ण राज्यात तांदूळ नागरी म्हणून ओळख जातो,मात्र याच तांदूळ नगरीत अधिकऱ्यांच्या संगनमताने तांदळाची काळा बाजारी होत असल्याचे समोर आले आहे,गोंदिया जिल्यात जिल्हा मार्केटींग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंळाच्या वतीने खरीप आणि रब्बी हंगामात लाखो क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले असून याची भरडाई गोंदिया जिल्या सह भंडारा ,गडचिरोली,चंद्रपूर तसेच नाशिक आणि नगर जिल्यातील काही राईस मिलर्स कडून याची भरडाई करण्यात येत असून तयार झालेला तांदूळ गोंदिया जिल्याच्या आठही तालुक्यात असलेल्या शासकिय तसेच भाड्याने घेतलेल्या गोदामात जमा करण्यात येत असून हा तांदूळ एफ सी आय च्या गाईड लाईन प्रमाणे नसताना देखील डम्प करण्यात येत आहे.
धानाचे कोठार अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्यात मोठया प्रमाणात धानाचे उत्पादन होत असुन त्याची भरडाई राईस मिलर्सच्या माध्यमातून केली जात असून तयार झालेला तांदूळ हा शासन गोर गरीब लोकांना रेशन दुकानाच्या मार्फत देतो. मात्र हे तांदूळ खाण्या योग्य आहे कि नाही यांची तपासणी करावी लागते.मात्र गोंदिया येथील शासकीय गोदामात राईस मिल धारकांकडून जमा करण्यात येत असलेल्या तांदळाची तपासणी होत नसल्याचे समोर आले असून. हा प्रकार गोरेगाव तालुक्यातील शासकीय तांदूळ गोदामात पाहायला मिळाला आहे .तर या ठिकाणी तांदूळ खाली होता असताना पाण्यात भिजलेला तांदूळ तसेच बुर्शी लागलेला तांदूळ देखील उतरविण्यात आला आहे . या बदल संबधीत गोडाऊन किपर शहारे आणि तांदूळ गुणवंता अधिकारी पांढुरग हांडे याना विचारणा केली असता. सुरवातीला त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला तर तांदूळ तपासायचे केमिकॅल आणि सालटीग मशीन बद्दल विचारणा केली असता .त्यांनी काही वेळातच ती केमिकॅल टेस्टिंग किट दुसऱ्या गोडाऊन मधून आणत असताना आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले .मात्र तरी देखील तांदळाची गुणवत्ता तपासून दाखवू शकले नाही .तर गोडाऊन किपर शहारे आणि पांडुरंग हांडे याना मंगेश वासनिक या इसमा बद्दल विचारणा केली असता . त्याला आम्ही आपल्या पगारातून १० हजार रुपये देतो तो बेजरोजगार आहे . तुम्ही देखील आमच्या कडे कामावर या तुम्हाला देखील १० हजार रुपये महिना देऊ अशी माहिती गोडाऊन किपर शहारे यांनी दिली.