– न्यायासाठी पत्रकार परिषदेत धाव !
नागपूर :- कोराडी पावर प्लांट महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने 1972 पासून जमीन संपादित करून वीज प्रकल्प तयार करण्यासाठी शेतीच्या मोबदल्यात घराघरातील प्रत्येकी एकाला सरकारी नोकरी देऊ असे त्यावेळेस कंपनीने आश्वासन दिले होते. त्याच वेळेस जिल्हाधिकारी यांनीही आश्वासन दिले होते.
2009 नंतर आम्हाला कायमस्वरूपी नोकरी न देता फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून कामावर घेऊन तुटपुंज्या मानधनावर आठ तास राबवून घेतात त्यातही कोणतीही सुविधा नाही. पीएफ सुद्धा देत नाही म्हणून आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही २९ जुलै पासून कोराडी मंदिर टी पॉईंट वर महानिर्मिती कंपनी व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आमरण उपोषणात बसलो आहोत.
मागण्या –
महानिर्मिती कंपनीत विशिष्ट श्रेणी निर्माण करून त्यात प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांना परीक्षा व वयाची अट न ठेवता महानिर्मिती कर्मचाऱ्याप्रमाणे कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.
महानिर्मिती कंपनीत कार्यरत असलेल्या ज्या प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रचलणार्थी यांची 45 वर्षे झालेली आहे. त्यांच्या विद्या वेतनात कपात केली जाते ती न करता त्यांची मानधन 35 हजार रुपये करण्यात यावी अशी मागणी केली.पत्र परिषदेला नरेंद्र भांगे, हेमंत मुसळे, संजय ठाकरे, शैलेश नारे, संदेश नवघींगे यांची उपस्थिती होती.