नागपूर :-बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी काल सकाळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बरखास्त केल्यावर सायंकाळी बसपाचे विदर्भ विभागातील महासचिव एड सुनील डोंगरे (वर्धा) यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. आज नागपुरातील बसपाच्या प्रदेश कार्यालयात त्यांचे आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
सुनील डोंगरे हे जीवन विमा मध्ये अधिकारी होते त्यांनी बसपाच्या कार्यासाठी दोन वर्षांपूर्वी स्वेच्या निवृत्ती घेतली होती. बहन मायावती यांनी त्यांचेवर यापूर्वी विदर्भाची जबाबदारी दिली होती.
बहन मायावतीनी माजी प्रदेशाध्यक्ष एड परमेश्वर गोणारे यांना कर्नाटकचे प्रभारी म्हणून तर माजी उपाध्यक्ष एड संदीप ताजने यांचेवर छत्तीसगडचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली.