– MBA-UGC-सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण परीक्षेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हा
नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) तील विद्यार्थ्यांसाठी एमबीए, युजीसी, मिलिटरी भरती परीक्षेसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. सन 2024-25 या वर्षातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाज्योतीने चाचणी परीक्षेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया 24 जून 2024 ते 14 जुलै 2024 पर्यंत अर्ज www.mahajyoti.org.in च्या संकेतस्थळावर मागविण्यात आले होते. महाज्योतीचा संकेतस्थळावर या चाळणी परीक्षेचे प्रवेश पत्र 5 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार तर परीक्षा ही 6 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.. सर्व विद्यार्थ्यांना सदर चाळणी परीक्षेकरिता प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
महाज्योती मार्फत यंदाच्या एमबीए, युजीसी, मिलिटरी भरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. महाज्योतीमार्फत प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात विद्यावेतन देखील देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी रुजू होताना एकरकमी आकस्मिक निधी देखील देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड ही प्रवेश परीक्षा घेऊन करण्यात येत आहे. त्याकरिता चाळणी परीक्षेचे हजारो अर्ज महाज्योतीमार्फत स्वीकारण्यात आले होते. अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षेचे प्रवेशपत्र 5 ऑगस्ट 2024 पर्यंत संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे. तसेच 6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले.