– सिव्हीजीलवर 67 तक्रारी
– आचारसंहिता भंगाचे एकुण 10 गुन्हे दाखल
– फिरत्या पथकांनी सतर्क राहण्याचे निरीक्षकांचे निर्देश
भंडारा :- विधानसभा निवडणुका या निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी विशेषत एफएसटी म्हणजे फिरत्या पथकांनी सतर्क राहावे , मोफत वाटपाच्या वस्तुंच्या वाहतुकीवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश सामान्य निरीक्षक विजयकुमार गुप्ता यांनी काल झालेल्या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात तीनही निवडणुक निर्णय अधिकारी तथा नोडल अधिकारी तसेच एफएसटी व एसएसटी पथकांची बैठक घेण्यात आली.यावेळी खर्च निरीक्षक अनिरुध्द ,पेालीस निरीक्षक धमेंद्रसिंह भदौरीया यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते,पोलीस अधिक्षक नुरूल हसन उपस्थित होते.
आचारसंहिता भंग करणा-या घटना तसेच व्यकतींवर लक्ष ठेवुन कारवाई करावी.कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी पेालीस आणी एफएसटीने संपर्क व समन्वयाने कारवाई करावी.एफएसटी पथकातील नियुक्त अधिकारी -कर्मचा-यांनी सजग राहावे.तसेच सिव्हीजील ॲपवर येणा-या तक्रारींचा 100 मिनीटांत निपटारा झाला पाहिजे.आणि नोडल अधिकारी खर्च यांनी देखील खर्च मर्यादेचा उल्लंघन करणा-या उमेदवारांवर लक्ष ठेवून योग्य ती कार्यवाही केली पाहीजे.
आतापर्यत सिव्हीजीलवर 67 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत .त्यापैकी भंडारा -2 ,तुमसर 60,साकोली -0 तर 5 तक्रारी तथ्य नसल्याने वगळण्यात आल्या.
तर आचारसंहिता भंगाचे एकुण 10 गुन्हे दाखल झाले ,त्यापैकी एफआयआर 8 आणी एनसीआर 2 (ताकीद देणे) दाखल झाले आहेत.
तसेच मतदान केंद्रावर दिव्यांगाना व्हिलचेअर आणी अन्य व्यवस्था उपलब्ध करून ि देण्याचे निर्देश ही सामान्य निरीक्षकांनी दिले.प्रचारादरम्यान निर्देशांचे उल्लघंन केल्यावर निष्पक्ष पध्दतीने यंत्रणांनी कारवाई करण्याचे अपेक्षीत आहे.
निरीक्षकांचे काम हे आयोगाचे कान ,नाक,डोळे असून निवडणुकीच्या काळात आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
येणा-या 18 तारखेला सायंकाळी 6 वाजता प्रचार थांबणार असून त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते6 दरम्यान मतदान होणार आहे.