– कापूस उत्पादन वाढीसाठी अतिधन कापूस लागवड पद्धतीचा अवलंब करावा – शुभा ठाकूर
नागपुर :- भारत सरकारच्या कैन्द्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय व वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहाय्याने देशातील कापूस उत्पादन वाढीसाठी कापूस विशेष प्रकल्प महाराष्ट्रामध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था सीआयसीआर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव गावातील प्रकाश हिंगावे आणि टैभरी गावातील राजेंद्र लोखंडे या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शुभा ठाकूर अतिरिक्त सचिव (पीक आणि बियाणे) केन्द्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय दिल्ली यांनी कापसाच्या विशेष प्रकल्पाला भेट दिली. आणि प्रकल्पातील शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. प्रकल्पातील शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले असता प्रचलित लागवडी पेक्षा अतिघन कापूस लागवड पद्धतीमध्ये कापसाचे उत्पादन अधिक वाढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भेटी नंतर सीआयसीआर येथे राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शुभा ठाकूर अतिरिक्त सचिव, डॉ. अरविद वाघमारे संचालक डीओसीडी कृषी मंत्रालय, डॉ.सी.डी.मायी माजी संचालक सीआयसीआर, डॉ.अर्जुन तायडे मुख्य नोडल अधिकारी विशेष प्रकल्प, गोविंद वैराळे प्रकल्प समन्वयक सिटी सीडीआरए महाराष्ट्र, प्रगतीशील शेतकरी दिलीप ठाकरे अकोला उपस्थित होते. शुभा ठाकूर अतिरिक्त सचिव यांनी शेतकऱ्यांना शेतकरी दिनानिमित शुभेच्छा दिल्या तसेच कापूस विशेष प्रकल्प राबविल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरडवाहू शेतीमध्ये वाढ करण्यासाठी एचडीपीएस कापूस प्रकल्प शेतकऱ्यांनी घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. डॉ. तायडे यांनी भारतात सुरु असलेल्या विशेष प्रकल्प राबविण्याबाबत माहिती दिली. डॉ.ए.एल. वाघमारे यांनी प्रकल्पातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. गोविंद वैराळे यांनी २०२३-२४ – २०२४-२५ मधील महाराष्ट्रातील सिटी सीडीआरए च्या प्रकल्पाची माहिती दिली. एचडीपीएस प्रकल्पामुळे उत्पादकता वाढली तसेच एचडीपीएस प्रकल्पामुळे भारताचे उत्पादन वाढेल, असे मत डॉ.सी.डी. मायी यांनी व्यक्त केले. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी पोहाणे आणि अकोला जिल्ह्यातील दिलीप ठाकरे यांनी त्यांचा अनुभव व्यक्त केला असता एचडीपीएस तंत्रज्ञानमुळे उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे सांगितले. राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित सात प्रगतशील कापूस शेतकऱ्यांचा अतिरिक्त सचिवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सीआयसीआर चे शास्त्रज्ञ व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते तसेच कृषी विभागाचे येले उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर दिपाली कुंभार एसडीएओ तथा तालुका कृषी अधिकारी हिंगणा, मनिषा थेरे तालुका कृषी अधिकारी नागपूर, युगांतर मेश्राम, अमित कवाडे, जगदीश नेरलवार प्रकल्प अधिकारी, सिटीसीडीआरए रिद्धेश्वर आकरे, कापूस विस्तार सहाय्यक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.बाबासाहेब फंड ज्येष्ठ शास्त्रज्ञ सीआयसीआर यांनी केले तर डॉ. वासनिक ज्येष्ठ शास्त्रज्ञ सीआयसीआर यांनी आभार मानले.