श्री.क्षेत्र आदासा तिर्थक्षेत्राच्या विकासामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील – सुनील केदार

पर्यटकांसाठी ॲडव्हेंचर पार्कची सुविधा

        नागपूर, दि. 9 : श्री. क्षेत्र आदासा हे तिर्थक्षेत्र भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांना सर्व सोयीसुविधा मिळण्याच्या दृष्टीने सर तिर्थक्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. त्याबरोबरच पर्यटनासाठी हे क्षेत्र महत्वाचे असल्याने येथे ॲडव्हेंचर पार्कची निर्मिती करण्यात येणार असुन विविध खेळाच्या पार्क निर्मितीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा पशंसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.

            श्री. क्षेत्र आदासा येथील तिर्थक्षेत्र विकासाबाबत सादरीकरण द विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन येथील कार्यालयात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सहाय्यक वनसंरक्षक पालवे, एनएमआरडिएच्या अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, वास्तुविशारद भिवगडे तसेच समाजिक वनीकरण विभाग व संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

             केदार म्हणाले की, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी या क्षेत्रात विविध प्रकारचे प्रकल्पाची निर्मिती करण्यात यावी. विविध प्रकारचे खाद्यानाचे स्टाल उभारणीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे  त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, विविध पर्यटन योजना राबविण्यात येणार आहेत. तसेच मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले.

            या तिर्थक्षेत्राच्या पर्यटन विषयक विकासासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामध्ये सर्व विकास कामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या असून  अतिरिक्त लागणार निधीसाठी पाठपूरावा करण्यात येईल, असेही  केदार म्हणाले. या ठिकाणी आवश्यक सुविधांची त्याठिकाणी प्राधान्याने तजवीज करण्यात यावी. यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे ते म्हणाले.

            प्रारंभी मनिष भारद्वाज यांनी सादरीकरणाद्वारे क्षेत्राचा पर्यटन विषयक आराखडयाबद्दल अवगत केले. या क्षेत्रात भव्य कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असून त्या आतील भागात खेळाचे पार्क व बाहेरील भागात फुटबॉल हॉर्स रायडिंग, 55 हेक्टर जमिनीवर वन्यजीवांकरीता ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी विविध प्रकारचे वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

            विविध प्रकारचे खाद्यानाचे स्टाल, पेंचमध्ये सौर उर्जेवर चालणारी नाव आहे त्याच धर्तीवर येथेही तयार करण्याचे ठरविले आहे.स्काय सायकल, मल्लखांब व जिम्नॉस्टिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पेटी झु, एरो स्पोर्ट प्रामुख्याने परदेशात प्रसिध्द आहे ते सुध्दा येथे आणण्याचा प्रयत्न आहे. या आराखाडयानुसार विकासात्मक योजना राबविल्या तर निश्चितच भाविक व पर्यटकांना हे तिर्थक्षेत्र भावेल, असे त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वार्षिक फायर ड्रिल स्पर्धेत त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्र विजेता

Sat Apr 9 , 2022
वैयक्तिक शिडी ड्रिल स्पर्धेत बबन जाधव विजेता नागपूर, ता. ९ : कोरोनामुळे दोन वर्षानंतर राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे शनिवारी (ता. ९) वार्षिक ड्रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्राने १ मिनिटं १० सेकंदात ड्रिल पूर्ण करीत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच लकडगंज अग्निशमन केंद्र १ मिनिट ११ सेकंदात ड्रिल पूर्ण करून द्वितीय तर सक्करदरा अग्निशमन केंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com