संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– ड्रॅगन पॅलेस ची रोषणाई आकर्षणाचे केंद्र
कामठी :- देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे ड्रॅगन पॅलेस च्या प्रमुख ऍड सुलेखा कुंभारे यांच्या शुभ हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे असलेल्या डॉ बाबासाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला रंगीबेरंगी रोषणाईची सजावट करण्यात आली असून संपूर्ण ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसर हा तिरंगाणी न्हाऊन निघाला होता. ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला करण्यात आलेली रोषणाई ही येणाऱ्या भविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले.ड्रॅगन पॅलेस ला करण्यात आलेली रोषणाई बघण्याकरिता पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती.
कार्यक्रमाला ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील धम्मसेवक ,धम्मसेविका,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र ,हरदास शैक्षणीक व सांस्कृतीक संस्था,दादासाहेब कुंभारे प्रशिक्षण केंद्र, ओगावा सोसायटी,हरदास विद्यालय,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल, बहुजन रिपब्लिकन एकता मंच येथील पदाधिकारी ,शिक्षक वृंद,सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.