प्रख्यात सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीच्या डायलॉगने रामटेक वासी झाले मंत्रमुग्ध आणि तृप्त।रामनवमीच्या पूर्वसंध्येला रामायण महानाट्याला जनतेचा भरभरून प्रतिसाद।
रामटेक – प्रख्यात सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी रामटेक सुपर मार्केट येथे पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचे संकल्पनेतून साकार रामायण महानाट्य कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली त्यामुळे रामटेक वासियांकरीता विशेष आकर्षण ठरली कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन ने झाली. प्रख्यात सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या डायलॉग ने रामटेक वासी मंत्रमुग्ध झाले. रामटेक वासियांच्या आग्रहास्तव रामटेक ला मी पुन्हा येणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली हे विशेष. हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची रामटेक येथील सुपर मार्केट येथे श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर झालेल्या रामायण महानाट्य कार्यक्रमात त्या उपस्थित असल्याने रामटेक वासियाकरिता जणू कार्यक्रमाचे विशेष आकर्षणच होते. यावेळी आयोजक यांनी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे शाल श्रीफळ देऊन गौरव सत्कार केला.
यावेळी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, हुकुमचंद आमधरे ,सभापती कला ठाकरे ,संध्याताई चौकसे , बबलू दुधबर्वे मंचकावर उपस्थित होते. उद्घाटन नंतर परिसर मधील नागरिक रामायण महानाट्य बघण्यात मग्न झाले होते.यावेळी बघणाऱ्या ची भरगच्च गर्दी दिसून आली. प्रख्यात सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळीच्या डायलॉगने रामटेक वासी मंत्रमुग्ध आणि तृप्त झाले होते .रामनवमीच्या पूर्वसंध्येला रामायण महानाट्याला जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळा, सुंदर निसर्गाच्या सानिध्यात मनमोकळेपणाने श्वास घेण्यासाठी हे स्थान पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. याच लाईटहाऊस वॉटरपार्क अॅण्ड रिसोर्ट तथा रामधामची कीर्ती ऐकून प्रख्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी थेट रामधाम व लाईट हाऊसला भेट दिली .
हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनाही रामधाम व लाईट हाऊस वॉटरपार्क तथा रिसोर्टविषयी भरभरून स्तुती केली. मला कळताच तत्काळ येथे येण्याचा मानस व्यक्त केला. असल्याचे सांगून मी खरोखरच भेट दिली असल्याचे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा जागेवर लाईट हाऊस वॉटरपार्क अॅण्ड रिसोर्टचा आनंद घेऊन पर्यटक सुखावतो. प्रख्यात अभिनेत्री प्राजक्ता माळीपण लाइट हाऊस वाटर पार्क व रिसोर्टचा आनंद घेण्यासाठी तथा जगातील सर्वात मोठा ॐ बघण्यासाठी आली असल्याचे यावेळी सांगितले….