संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड गावातील घरासमोर उभी असलेली 30 हजार रुपए किमतीची ऍक्टिवा दुचाकी क्र एम एच 40 सी एन 9540 कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सकाळी सहा वाजता निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी सचिन मेश्राम वय 39 वर्षे रा घोरपड कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध बीएनएस कलम 303 (2)अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.