मुंबई :- मुंबईमध्ये बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल करून ईव्ही बाईक रस्त्यावर चालवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा ईव्ही बाईक्सवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सरनाईक बोलत होते.
आतापर्यंत बॅटरी क्षमतेमध्ये बदल केल्याप्रकरणी २११ गुन्हे नोंदवण्यात आल्याचे सांगून परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, अशा प्रकारे बदल केलेल्या ८८९ ईव्ही बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. काही कंपन्यांकडून क्षमता वाढवून ईव्ही बाईक्स रस्त्यावर फिरवल्या जात आहेत. या चीनी बनावटीच्या बाईक्स सोसायटीमध्ये अंतर्गत वापररासाठीही आणल्या जात आहेत. अशा सर्वच ईव्ही बाईक्सची नोंदणीही अत्यावश्यक करण्याचे धोरण राबवण्यात येईल अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.