नागपूर :- गुन्हेशाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत वर्धमान नगर रोड, हनी इंद्रा टॉवर येथील द सलुनवाला युनिसेक्स सलुन अॅण्ड अकॅडमी येथे रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी महिला १) प्रिती शुभम शेंडे उर्फ प्रिती शाहु, वय ३४ वर्षे, रा. प्लॉट नं. ८६. शास्त्री नगर, प्राथमीक शाळेजवळ, लकडगंज, नागपूर ही स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता पिडीत महिलांना पैशाचे आमिष देवून, देह व्यापाराकरीता ग्राहकांकडुन पैसे घेवुन, देहव्यापारास जागा उपलब्ध करून देवुन महिलांकडून देह व्यवसाय करवून घेतांना समक्ष मिळुन आली. आरोपीचे ताब्यातुन चार पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. आरोपीचे ताब्यातुन ०१ मोबाईल फोन, ज्युपीटर मोपेड, रोख ९,०००/-रू. व इतर साहित्य असा एकुण ८९.९३०/-रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरूध्द पोलीस ठाणे लकडगंज येथे कलम ३७० भा.द.वि., सहकलम ४, ५, ७ पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव लकडगंज पोलीसांचे ताज्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागुपर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), मा. सहा पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, सामाजिक सुरक्षा विभागाचे मपोनि कविता इंसारकर, पोहवा. सचिन बडीये, प्रकाश माथनकर, लक्ष्मण चवरे, मसफौ. लता गवई व नामपोअं. आरती चव्हाण यांनी केली.