शस्त्र बाळगणारा अल्पवयिन मुलावर कारवाई 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पेलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नंबर सहा येथे हातात धारदार शस्त्र बाळगुण दहशत पसरविणाऱ्या विधिसंघर्ष बालकास पोलीसांनी पकडुन शस्त्र जप्त करुन कारवाई करण्यात आली आहे.

प्राप्त माहिती नुसार, गुरुवार (दि.२०) जुन सायंकाळी ४ वाजता दरम्यान कन्हान पोस्टे चे सपोनि राहुल चव्हाण, हरिष सोनभद्रे, अमोल नागरे, संदीप गेडाम आदि पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करित असताना कोळसा खदान नं.६ येथे अल्पवयिन युवक हातात धारदार शस्त्र बाळगुण नागरिका मध्ये दहशत पसरवित आहे. अशा माहिती वरुन पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता युवक संश यास्पद रित्या हालचाली करत असतांना दिसला. पोलीसांनी ताब्यात घेऊन विचारपुस करुन अंगझडती घेत ली असता कमरे जवळुन एक धारदार चाकु मिळुन आला. सपोनि राहुल चव्हाण यांचा तक्रारी वरून विधि संघर्ष बालका विरुद्ध कारवाई करित गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांचा सोलर पैनल चे नुकसान 

Sat Jun 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत करण्याची मागणी .  कन्हान :- खोपडी (खेडी) येथील शेतकरी रविंद्र सोमकुंवर यांच्या शेतात विहिरीतुन पंपने पाणी घेण्याकरिता लावलेले सोलर पैनल चे वादळी वाऱा व पावसामुळे उडुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कन्हान पासुन पुर्वेस ८ किमी अंतरावर रविंद्र सोमकुंवर यांची तीन एकर शेती खोपडी (खेडी) येथे असुन मागच्या वर्षी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com