नागपूर :- गुन्हेशाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांना माहीती मिळाली की, एक महीला ही ऑनलाईन बुकींग घेवुन देहव्यापाराकरीता महीला तथा मुली उपलब्ध करून देते. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत व्हेरायटी चौक ते झीरो माईल दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यालय समोरील रोडवर, सार्वजनिक ठिकाणी रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी महिला स्मिता उर्फ आरती प्रेम ढोले, वय ३७ वर्षे, रा. मिलीद बुध्द विहार जवळ, रामबाग, नागपूर ही स्वतः ये आर्थिक फायदयाकरीता पिडीत महिलांना पैशाचे आमिष देवून, देह व्यापाराकरीता ग्राहकांकडुन ऑनलाईन आगाऊ पैसे घेवुन, पिडीत महिलेस ग्राहकाला घटनास्थळी देह व्यवसाय करीता उपलब्ध करूत देताना समक्ष मिळून आली. तिचे ताब्यातुन एका पिडीत मुलीची सुटका करण्यात आली. आरोपीचे ताब्यातुन ०१ मोबाईल फोन, ज्युपीटर मोपेड असा एकूण ३०,०००/-रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपी महीला ही तिचा साथीदार पाहीजे आरोपी सलमान उर्फ रोशन डोंगरे, वय ३० वर्षे, रा. हिलटॉप अंबाझरी, रागपुर याचे सोबत मिळुन देहव्यापार करीत असल्याचे निष्षण्ण झाल्याने आरोपीविरुध्द पोलीस ठाणे सिताबर्डी येथे कलम ४, ५, ७ पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस मुद्देमालासह पुढील
कारवाईस्तव सिताबर्डी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पाहीजे आरोपीचा शोध व पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागुपर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन),सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, सामाजिक सुरक्षा विभागाचे मपोनि, कविता ईसारकर, पोहवा. सचिन बडीये, नापोअं शेषराव राऊत, अश्विन मांग, समीर शेख, पोअं. कुणाल मसराम, नितीन वासने, कमलेश क्षिरसागर, मसफौ. लता गवई व मपो पुनम शेंडे यांनी केली.