संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– अन्न सुरक्षा अधिकारी आणि कन्हान पोलीस डी. बी पथक यांची संयुक्त कार्यवाही.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड नं. ४ येथे हिना अँक्वा जवळ सुगंधित तंबाखु विक्री करणा ऱ्याला अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि कन्हान पोलीस डी.बी पथकांनी पकडुन त्याचे जवळुन १७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.२२) एप्रिल ला दुपारी १ वाजता दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि कन्हान पोलीस डी.बी पथक सुगंधित तंबाखु विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहिती मिळाली कि कांद्री वार्ड नं. ४ येथे हिना अँक्वा जवळ सुगंधित तंबाखुची विक्री सुरु आहे. अश्या माहिती वरुन अधिका-यानी व डी.बी पथकाने घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता एक युवक सुगंधित तंबाखु विक्री करतांना मिळुन आल्याने त्याचे नाव यशवंत ऊर्फ शुभम अंजु सिंग वय २० वर्ष, कांद्री असे सांगितले. सदर प्रतिबंधित अन्न पदार्थ्याच्या पुरव ठ्याबाबत विचारले असता आरोपी यशवंत ने अन्न पदार्थ्याच्या साठ्या विषयी कुठलीही स्पष्ट माहिती दिली नसल्याने अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन आणि कन्हान पोलीस डी.बी पथकांने आरो पी यशवंत ऊर्फ शुभम अंजु सिंग ला अटक करुन त्याचा जवळुन १) सुगंधित तंबाखु (बागवान ४७) ५०० ग्रॅम चे ६ डब्बे प्रति ७२५ रुपये प्रमाणे ४३५० रुपये , २) सुगंधित तंबाखु (बागवान) असे लेबल असलेले एका बाजुने फोडुन खाली डब्बे एकुण ३०० प्रति १० रुपये प्रमाणे ३००० रु. ३) माजा १०८ असा लेबल असलेले नवीन बाॅक्स तयार करण्याकरिता लागणारे खरडे दोन पोत्यात भरलेले प्रत्येकी ५००० रुपये प्रमाणे १०,००० रुपये असा एकुण १७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोलीस स्टेशन ला एस.व्ही बाभरे यांचा तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण हे करित आहे.
सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, उपनिरीक्षक राठोड़, अमोल नागरे, सचिन वेळेकर, हरिष सोनभद्रे, संदीप गेडाम, निखिल मिश्रा सह पोलीस कर्मचाऱ्यांनी कार वाई यशस्विरित्या पार पाडली.