वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली ह‌द्दीत नाईकवाडी, बांग्लादेश चौकी जवळ, नागपुर येथे राहणारे फिर्यादी सागर शंकरलाल तेलमरे, वय ६५ वर्षे, यांनी त्यांची लाल रंगाची हिरो प्लेझर मोपेड क. एम.एच. ३१ डि.ए. ७०२० किंमती अंदाजे १५,०००/- रु. आनंद प्रल्हाद लॉन, टेकानाका टि-पॉईंट चे पार्कीगमध्ये हॅन्डल लॉक करून हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले असता, कोणीतरी अज्ञात घोरट्याने फिर्यादीची गाडी चोरून नेली फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासात पोलीस ठाणे पाचपावली येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, त्यांनी आरोपी क. १) समीर पठान उर्फ सुरेश सकुर पठाण, वय २५ वर्षे, रा. टेका नाका यादव चा तबेला, कपील नगर, नागपुर यांस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने दारूचे व्यसनामुळे नमुद वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्याची अधीक विचारपुस केली असता, आरोपीने वर नमुद मोपेड हि आरोपी क. २) अमीर खान कादर खान, वय ३२ वर्षे, रा. महेंद्र नगर, पाण्याचे टाकीजवळ यांस विकल्याचे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेवुन लाल रंगाची हिरो प्लेझर मोपेड क. एम.एच. ३१ डि.ए. ७०२० किंमती अंदाजे १५,०००/- रु. ची जप्त करण्यात आली आरोपी क. १ याची अधिक सखोल विचारपुस केली असता, त्याने पोलीस ठाणे यशोधरानगर ह‌द्दीतुन काळया रंगाची होडा डिओ मोपेड क. एम.एच. ४९ ए.ए. ४०५२ किमती अंदाजे ५५,०००/- रू. ची व सिल्व्हर रंगाची हिरो स्प्लेंडर क. एम.एच. ४९ ए.एस १७३३ किंमती अंदाजे ४०,०००/- रू. ची असे ०२ वाहने, जरीपटका ह‌द्दीतुन निळ्या रंगाची हिरो स्लेंडर क. एम.एच. ३१ डि.जे. ४०९६ किमती अंदाजे ५०,०००/- रु. चौ, कपील नगर ह‌द्दीतुन होंडा अॅक्टीव्हा ग्रे रंगाची एम.एच. ४९ के ७४३४ किंमती अंदाजे ४५,०००/- रू. बी, असे एकुण ०५ वाहने चोरी केल्याची कबुली दिली आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेले ०४ दुचाकी वाहने व एका वाहनाचे स्पेअर पार्टस असा एकुण किंमती अंदाजे २,०५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), पोलीस उप आयुक्त (परि. क. ३), सहा. पोलीस आयुक्त (लकडगंज) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि पावपावली बाबुराव राउत, सपोनि सोमवंशी, पोहवा. दिलीप पवार, प्रकाश पठाण, वासुदेव जयपुरकर, छगन शिंगणे, नापोअं अंकुश राठोड, गणेश ठाकरे, पोअं. हितेश फरकुडे व महेंद्र शेलोकार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवे ठार मारणाऱ्या आरोपींना अटक

Fri Jun 28 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे मानकापुर ह‌द्दीत प्लॉट नं. ०५, गिता नगर, झिंगाबाई टाकळी, नागपुर येथे आरोपी १) मनोज एकनाथ राजुरकर, वय ३० वर्षे व २) एकनाथ महादेव राजुरकर, वय ६५ वर्षे हे राहत असुन आरोपी क. १ याचा परीचीत फिर्यादीचा मुलगा नामे राकेश प्रकाश गमे, वय २५ वर्षे, रा. एम.बि. टाउन, मिनीमाता नगर, आटा चक्की जवळ, नागपूर याने मनोज याची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com