नागपूर :- पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत राजाबाक्षा ग्राऊंड, गेट समोर, गाडगे बाबा धर्मशाळेसमोर फिर्यादी कृष्णा नंदू यादव, वय ४५ वर्षे, रा. इंदीरा नगर, रेल्वे पावर हाऊस जवळ, जाटतरोडी, नागपुर ह्यांनी त्यांची पिवळ्या रंगाची डिओ मोपेड क. एम.एच. ४९ ए. व्ही. ६८८९ किंमती अंदाजे २५,०००/- रु. ची पार्क करून, मॉर्निंग वॉक करीत असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची गाडी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे ईमामवाडा येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३७९ भा.दं.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पोलीस ठाणे ईमामवाडा येचील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी रोशन अशोक बोबडे, वय ३८ वर्षे, रा. गोपाल नगर, तिसरा बस स्टॉप, प्रतापनगर, नागपूर वास ताब्यात घेवुन, त्याचे जवळील वाहनाबाबत विचारपूस केली असता, आरोपीने बर नमुद गुन्ह्यातील वाहन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताच्यातुन गुन्हयात चोरी केलेले वाहन किंमती २५,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीला अटक करण्यात आली.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि. क. ४), सहायक पोलीस आयुक्त (सक्करदरा विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. कमलाकर गड्डीमे, पोहवा. रविंद्र राऊत, संदीप बोरसरे, नापोअं. सुशिल रेवतकर, पोअं. रंजीत सक्करवार व देवेंद्र भोंडे यांनी केली.