नागपूर :- पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत, मोहगाव झिल्पी, ता. हिंगणा, जि. नागपूर येथे राहणारे फिर्यादी मुकेश मनोहर नारनवरे, वय ४३ वर्षे, यांनी त्यांची स्प्लेंडर मोटरसायकल क. एम.एच ४० बी.एन ८८८१ किमती अंदाजे २५,०००/- रू वी ही त्यांचे मोहगाव झिल्पी येथील शेताजवळ ऊभी करून काम करण्याकरीता शेतात गेले असता, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे हिंगणा येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हयाने समांतर तपासादरम्यान हिंगणा चे अधिकारी व अंमलदार यांनी खात्रीशीर गोपनीय माहिती व तांत्रिक तपास करून, आरोपी नामे १) रितीक श्रीराम वाघाडे, वय २३ वर्ष, २) प्रणिकेत केशवराव नागोसे वय १९ वर्ष दोन्ही रा. हिंगनी, धामनगाव, ता. सेलु, जि. वर्षा ३) रविन्द्र उर्फ रवि वामन मढवे वय ३४ वर्ष रा. गळव्हा, ता. बाबुळगाव जि. यवतमाळ यांना ताब्यात घेवुन विचारापुस केली असता, त्यांनी वर नमूद गुन्हा संगणमत करून केल्याची कबुली दिली. तसेच आरोपींना अधिक सखोल विचारपूस केली असता आरोपींनी नागपूर शहर व वर्धा जिल्हयातुन वेगवेगळया ठिकाणाहुन एकूण ११ दुचाकी वाहने चोरी केल्याचे सांगीतले. आरोपींचे ताब्यातुन गुन्हयात चोरी गेलेली मोटरसायकलसह एकुण ११ मोटरसायकल किंमती अंदाने एकुण ४,१५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त (परि क. १), सहा. पोलीस आयुक्त एम. आय.डी.सी विभाग, यांचे मार्गदर्शनात, वपोनि विनोद गोडबोले, सपोनि पांडुरंग जाधव, पौअं. आनंद वानखेडे, अजय गिरडकर, नागेश दासरवार, संतोष येलूर, विनोद दुरदकर, मपोअ, मनिषा भेंडाकर, जयश्री किरवे, दिपाली वैरागडे, वैशाली सांडेल यांनी केली.