चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीत आर. एच. ११ बुदेल महींद्रा मिहान खापरी नागपुर येथे राहणारे देवेंद्र प्रतापसिंग रॉय वय ६४ वर्ष, हे दि. १२.०५.२०२४ रोजी बेंगलोर येथे जाण्याची तयारी करीत असता, त्यांना अलमारीत ठेवलेले सोन्याचे दागीने बांगडया, हार, अंगठी असा एकुण किंमती ३.२१,५००/रू या मुद्दे‌माल दिसुन आला नाही, दिनांक ०१,०५,२०२४ चे १०.०० वा. ते दि. ०३.०५.२०२४ चे २२.२० वा. चे दरम्यान फिर्यादीची पत्नी स्वामी विवेकानंद हॉस्पीटल येथे अॅडमीट असल्याने घराची चाबी घरकाम करणाऱ्या महीलेकडे दिली होती नमुद महीलेसोबत गाडी चालक आरोपी अंकीत दिलीप भोगे वय ४५ वर्ष रा. परसोडी वर्धा रोड, बेलतरोडी नागपुर हा सुध्दा घरी आलेला होता, फिर्यादी यांनी पोलीस ठाणे सोनेगाव येथे तकार अर्ज दिलेला होता नमुद तकार अर्जाचे चौकशी सुरू होती. गुन्हेशाखा युनिट क. ०१ वे अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी अंकीत दिलीप भोगे यास ताब्यात घेवुन त्याची सखोल विचारपुस केली असता, आरोपीने नमुद मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन चार सोन्याच्या बांगडया व एक अंगठी, असा एकुण ३,५४,०००/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीने ईतर दागीने विक्री केल्याबाबत सांगीतले, आरोपीस जप्त मुद्देमालासह सोनेगाव पोलीसांचे ताब्यात देण्यात आले. पोलीस ठाणे सोनेगाव येथे सर. तर्फे सफौ. अजय पंचभाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरूध्द पोलीस ठाणे सोनेगाव येथे कलम ३८० भ.दं.वि नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन),सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली,

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

RAIN WATER HARVESTING से कोसो दूर METRO RAIL

Thu May 23 , 2024
– नागपुर परियोजना के करार में अंकित होने के बावजूद कोई व्यवस्था नहीं  नागपुर :- तत्कालीन MD बृजेश दीक्षित के कार्यकाल में मेट्रो रेल का नागपुर में काम शुरू हुआ,इस दौरान चेहरे देख काम बांटा गया, इस क्रम में कई खामियां को सिरे से नज़रअंदाज की गई,जैसे अम्बाझरी तालाब के निकट डेढ़ दर्जन पिलर और सम्पूर्ण प्रोजेक्ट में RAIN WATER […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com