संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कन्हान पोलीसांची अवैद्य कोळसा चोरी प्रकरणी कारवाई
कन्हान :- पोस्टे अंतर्गत खंडाळा शिवारात कन्हान पोलीसानी तीन दुचाकीवर कोळसा चोरून नेताना एक विधीसंर्ष बालकासह दोन आरोपीना पकडुन त्या चे जवळुन चौसठ हजार पाचशे रूपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली.
बुधवार (दि.२६) जुन २०२४ ला खंडाळा शिवा रात पोस्टे कन्हान येथिल स्टाफ तपास कामी निलज खंडाळा शिवारात जात असतांना काही इसम आप आपल्या दुचाकीवर दगडी कोळसा घेवुन जाताना दिस ल्याने पोलीसांनी त्याना थांबवुन पकडले यात १) होंडा शाईन दुचाकी क्र. एमएच- ३१ एस डब्लु – ००२० चा चालक आरोपी श्रवण सत्यनारायण यादव वय २४ वर्ष, २) हिरो होंडा दुचाकी क्र. एमएच ४० यु २८७३ चा चालक विधीसंर्ष बालक, ३) सुजुकी दुचाकी क्र. एमएच २९ एएच २१५ चा चालक आरोपी मनोज रामबाबु कश्यप वय २७ वर्ष, तिन्ही राह. खदान नं ६ यांना थांबवुन कोळ्स्या बाबत विचारपुस केली असता इंदर कोळसा खदान डम्पींग यार्ड येथुन आणल्याचे सांगितले. आरोपीतांच्या ताब्यातुन १२ बोरी दगडी कोळसा अंदाजे वजन ९०० किलो किंमत ४५०० रू, तीन दुचाकी किमत ६०,००० रू असा एकुण ६४,५०० रू.चा मुद्देमाल जप्त करून फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोस्टे कन्हान येथे आरोपीतां विरूद्ध कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली.
सदर कारवाई ही, हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक, ना.ग्रा, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात पोस्टे कन्हान ठाणेदार पोनि उमेश पाटील, पोहवा गुरूप्रकाश मेश्राम, पोशि गणपत सायरे हयांनी पार पाडली.