नागपूर :- दिनांक ३०.०६.२०२४ ये ०२.०० वा. ये सुमारास, पोलीस ठाणे एम.आय.डी.सी येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्याना संशयीत चार चाकी वाहन दिसल्याने पाठलाग करून इंडीका गाडीस थांबविले असता दोन ईसम पळून गेले. वाहनाची पाहणी केली असता, इंडीका वाहनामध्ये मागील बाजुस तिन गोवंशीय जानावरे यांना निर्दयतेने बांधुन ठेवल्याचे दिसले. वाहन चालक आरोपी १) सय्यद साजीद सय्यद अकील वय २८ वर्ष रा. डुडकेश्वर रोड, विकना बस स्टॉप जवळ, नागपूर व क्लीनर २) रोख आजीम शेख खलील वय २६ वर्ष रा. पठाण पेट्रोल पंप जवळ, दिघोरी, नागपूर यांना विचारपूस केली असता त्यांनी भिमनगर भागातुन नमुद तिन गोवंशीय जनावरे चोरी करून नेत असल्याचे सांगीतले. त्यांचे सोबत असलेले व पळून गेलेले आरोपीचे नाव विचारून, शोध घेवुन आरोपी क. ३) शेख मुस्ताक कुरैशी वय ३७ वर्ष रा. ठाकुर एजेंट, एकमिनार मस्जिद जवळ, मोठा ताजबाग, नागपूर ४) मोसिम लतीफ खान वय २३ वर्ष रा. एमएम ताज स्कूल जवळ, बिडीपेठ, नागपूर यांचा शोध घेवुन ताब्यात घेतले आरोपीविरुध्द पोलीस ठाणे एम.आय.डी.सी येथे गुन्हा नोंदवुन नमुद गुन्हयात बारही आरोपीना अटक करण्यात आली. आरोपीचे ताब्यातुन इंडीका वाहन क. एम.एच २७ ए.सी ४०८३ तसेच गोवंशीय जनावरे असा एकुण किंमती १,१०,०००/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीनी अधिक चौकशी केली असता त्यांनी तिन महिन्यापुर्वी सुध्दा पोलीस ठाणे हद्दीतुन गोवंश चोरी केल्याची कबुली दिली.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि. क. १), सहा. पोलीस आयुक्त (सोनेगाव विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, प्रविण काळे, सपोनि संजय बंसोड, पोहवा ओमप्रकाश भारतीय, स्माईल औरंगाबादे, नापोअ आशिष पौनिकर, पोअ धमेन्द्र यादव, वशष्ठी इंगळे व प्रितम रेवतकर यांनी केली.