नागपूर :- दिनांक ०८.०२.२०२३ चे ००.०० वा. ते दि. २२.०८.२०२३ दरम्यान, पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत राहणारी २२ वर्षीय फिर्यादी / पिडीता यांची दोन वर्षांपूर्वी आरोपी विजय पृथ्वीराज ठाकरे, वय २५ वर्षे, रा. कळमना, नागपुर याचे सोबत फेसबुकवर ओळख झाली होती. व त्यांचे आपापसात प्रेमसंबंध जुळले होते. काही कारणास्तव फिर्यादीने आरोपीसोबत संबंध तोडले. या कारणावरून आरोपीने फिर्यादीसोबत काढलेले फोटो व्हॉटस्अॅपव्दारे व्हायरल करून फिर्यादीची बदनामी होईल व फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून, धमकीचे मॅसेज पाठविले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे पोउपनि बाकडे त्यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४ (ड) (२) ५०९, ५००, ५०६ भादंवि सहकलम ३ माहीती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.