– पोलीस स्टेशन मौदा ची कार्यवाही
मौदा :- पोस्टे मौदा येथील स्टाफ पो. स्टे. हद्दीत स्टाफसह अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना भंडारा ते नागपूर NH-53 रोडवर ट्रक क्र. MH- 40/BF-1951 हा येताना दिसल्याने बोरगाव शिवारातील चोरगाव बस स्टॉप जवळ नाकाबंदी दरम्यान ट्रक थांबवून पाहणी केली असता १२ चाकी ट्रक क्र. MH-40/BF-1951 मध्ये अंदाजे १० ब्रास रेती मिळून आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी वावत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगून ट्रक मालकाचे सांगण्यावरून भंडारा येथील रेती घाटातून आणल्याचे सांगितले. सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने ट्रक क्र. MH-40/BF-1951 किं. रु. ३०,००,०००/- व त्यामधील १० ब्रास रेती किं. रु. ५०,०००/- व एक विवो कंपनीचा मोवाईल किंमती १०,०००/- रू असा एकूण रु. ३०,६०,०००/- चा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालक नामे १) तुषार अंकुश रेहपाडे वय २८ वर्ष, २) क्लीनर सुधीर रमेश शेंद्रे, वय २८ वर्ष दोन्ही रा. बित्तापूर ता. जि. भंडारा तसेच ट्रक क्र. MH 40/BF 1951 चा मालका विरुद्ध पोस्टे मौदा येथे कलम ३७९, १०९, ३४ भा. द. वी. सहकलम ४८(७), ४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४. २१. खाणी आणि खनिजे अधी. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. मौदा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पो. अधिकारी कामठी विभाग, ठाणेदार पो.नि. सतीशसिंह राजपूत, पो. उपनी महेश वोथले, पोहवा. संदीप कडू, पो. हवा. गणेश मुदमाळी, पो.हवा. रुपेश महादुले, आकेश गाढवे यांनी केलेली आहे.