नागपूर :- फिर्यादी कमलराव नथ्थूराम सिन्हा वय २१ वर्ष रा. येरखेडा, नविन कामठी, नागपूर हा झोमॅटो कंपनी मध्ये डिलेवरी बाँय काम करत असुन अज्ञात आरोपीने झोमॅटो कंपनीचे अॅपवरून पेस्ट्रीचा ऑर्डर दिला होता. फिर्यादी हे ठाणे सक्करदरा हद्दीत यासीन प्लॉट, फारूख पानठेल्याचे मागे गल्लीत, ताजबाग, नागपूर येथे आरोपीचा ऑर्डर घेवुन गेले असता, आरोपीने फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, नगदी ५००/- रू व पेस्ट्री असा एकूण २४,०८०/- रू चा मुद्देमाल जबरीने हिकावुन पळून गेला, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३९२ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी रिजवान उर्फ रिज्जू रहमत वेग वय १९ वर्ष रा. हबीब नगर २, पोलीस ठाणे गाडगे नगर, अमरावती हद्दीतुन ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, आरोपीने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन फिर्यादीचा मोबाईल, एक लोखंडी चाकु नगदी ५००/- रू असा एकुण २३,७००/- रू या मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी सक्करदरा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि रमेश ताले, पोउपनि वैभव बारंगे, पोहवा. सतिश, युवानंद, पुरुषोत्तम, नापोअ. चेतन यांनी सायबर टिमचे मदतीने केली,