मौदा :- यातील फिर्यादी ही १२ वी मध्ये शिक्षण घेत असुन फिर्यादीच्या भावाचा मित्र आरोपी नामे शुभम रतन धनजोडे, वय २४ वर्ष, रा. केसोरी ता. कामठी जि. नागपूर याला फिर्यादी ही ०२ वर्षांपासून ओळखते शाळेमध्ये जात असतांनी फिर्यादीच्या मागे मोटारसायकलने यायचा व तुझ्यावर प्रेम आहे व फिर्यादीला “तुझासोबत लग्न करायचे आहे” असे म्हणून शाळेत जात असतांनी थांबवून बोलायचा फिर्यादीने त्याला नकार दिला तेव्हापासून फिर्यादी ही आरोपीसोबत बोलत नव्हती. फिर्यादीच्या भावाने पिडीत मुलगी तसेच आरोपीला बोलतांनी दिसल्यापासून बोलणे बंद केले होते. आरोपी हा केसोरी ते वडोदा जाणाऱ्या रोड दरम्यान भेटला व आरोपीने पिडीत मुलीला गाडीवर बसवले व प्रीनलाईट हॉटेल कुही रोड भूगाव येथे घेवून गेला आरोपीने हॉटेलमध्ये नेले व मैत्रीणीचे आधारकार्ड दाखवून सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. आरोपीने पिडीत मुलीला लग्नाचे आमीशं दाखवून पिडीत मुलीसोबत वारंवार बोलून पीडीत मुलीचा पाठलाग करून तिला वारंवार गाडीवर बसवून हॉटेलमध्ये घेवून गेला. लग्नाचे आमीश दाखवून व पीडीत मुलीचे ईच्छेविरूदध शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरूद्ध कलम ३७६ (२) (जे), ३७६ (२) (एन), भादंवी सहकलम ४, ६ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सोनेकर पोस्टे मौदा हे करीत आहे.