क्रिकेट मॅचवर सट्टा खायवळी करणारे आरोपी ताब्यात

नागपूर :- दिनांक २७.०६.२०२४ चे २१.४५ वा. ते २३.५५ वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा युनिट क. ३ पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलीस ठाणे वाठोडा हवीत मुकेश मालवन याचे घरी, प्लॉट नं. ९१, कोल्हे हाऊसिंग सोसायटी, तरोडी, नागपूर येथे भारत विरूध्द इंग्लैंड टि २० किकेट मॅचवर सट्टा सुरू आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, नमुद घटनास्थळी रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी १) राकेश उर्फ पिंटू मोरेश्वर भाईक, वय ४८ वर्ष रा. बडकस चौक, नागपूर २) अरविंद हरीभाऊ मुदगल वय ४८ वर्ष रा. आशीर्वाद नगर, नागपूर ३) विशाल केशव सोळंके वय ३४ वर्ष रा. तेलंगीपूरा, गांधीबाग, नागपूर ४) रोशन एकनाथ नंदनचार वय ३९ वर्ष रा. तांडापेठ, पाचपावली, नागपूर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता संगणमत करून टि २० वर्ल्डकपचे लाईवा भारत विरूध्द इंग्लैंड किकेट मॅचवर मोबाईलवरून संभाषण करून किकेट सट्टयाची ऑनलाईन खायवळी करतांना प्रत्यक्ष मिळुन आले, आरोपींचे ताब्यातुन मल्टीमीडीया मोबाईल व लाईनचे एकुण २८ नग मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, प्रिंटर, डोंगल, बुस्टर, टि.व्ही, लाईन बॉक्स व चार दुचाकी वाहने असा एकुण ६,३८,७६०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेवुन, आरोपी व त्यांचा पाहिजे आरोपी साथिदार नामे निशान चौधरी रा. बडकस चौक, नागपूर यांचेविरूध्द पोलीस ठाणे वाठोडा येथे कलम ४, ५ महा. जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करीता वाठोडा पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन),सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. मुकुंद ठाकरे व त्यांचे पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

Fri Jun 28 , 2024
– अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांना न्याय – शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ मुंबई :- महाराष्ट्राची गौरवशाली अध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपये, ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com