कळमेश्वर :-अंतर्गत कॉन्फीडन्स पेट्रोलियम इंडीया कंपनी लिमिटेड कंपनी रेल्वे स्टेशन कळमेश्वर येथे दिनांक ०३/११/२०२३, दि. २५/१२/२०२३, दि. २७/०१/२०२४, दि. ०४/०२/२०२४, दि. ०८/०२/२०२४ दरम्यान दि. ०७/०२/ २०२४ रोजी रात्री संतोष परते यांची सेक्यूरिटी सुपरवायझर म्हणून नाईट डयूटी होती. पहाटे ०३/०० वा. सुमारास संतोष यांनी फिर्यादी नामे राजेंद्र रामरावजी भगत, वय ५० वर्षे, रा. एलॉट नं. २, हरिओम सोसायटी, झिंगाबाई टाकळी नागपूर (कॉन्फीइन्स पेट्रोलियम इंडीया कंपनी लिमिटेड कंपनीत मैनेजर) याला फोन करून माहिती दिली कि, तिन अनोळखी ईसम खाली असलेले एक्सपायर हॉट रिपेयर १४.२ कि.ग्रॅ. खाली सिलेंडर भारत गैस कंपनीचे उबलून नेत होते. यातील दोन इसम पळून गेले व एक इसमाला पकडून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव १) देवेंद्र गंगाधर डांगे, रा. मालेगाव ता. सावनेर असे सांगितले, कळमेश्वर पोलीसांनी तपासा दरम्यान त्याचे इतर साथीदार नामे २) पवण सुरेंद्र हणवते, वय २८ वर्ष, रा. मेंढकि ता. काटोल ह. मु. गुरूव्दारा सावनेर ३) अजय कुंजीलाल सरियाम वय २८ वर्ष रा. मालेगाव ता. सावनेर ४) देवेन्द्रसिग लक्ष्मणसिंग राजपुत वय २८ वर्ष, रा. झाल्डा जि. राजगड (म.प्र) ह. मु. बोरूजवाडा यांना अटक करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे आरोपीतांविरुध्द कलम ४५४, ४५७, ३८०, ५११, ३४ भादंवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि कोलते हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक योगेश कमाले, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, सहायक फौजदार मनोज गाढवे, सफौ धुर्वास बांबल, पोलीस नायक राजेंद्र ठाकरे यांनी पार पाडली.